शाहिद कपूर फोटोग्राफर्सवर भडकला, म्हणाला ओरडू नका नाहीतर…

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण शाहिद हा सध्या त्याच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

शाहिद कपूर फोटोग्राफर्सवर भडकला, म्हणाला ओरडू नका नाहीतर…

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण शाहिद हा सध्या त्याच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. शाहिदच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो फोटोग्राफर्सवर भडकला आहे. शाहिद हा नुकताच पत्नी मिरासोबत मुंबईमध्ये (Mumbai) स्पॉट झाला. यावेळी अनेक फोटोग्राफर्सनं मिरा आणि शाहिद यांना घेरलं. हे फोटोग्राफर्स शाहिदला पाहिल्यानंतर फोटोसाठी ओरडू लागले. शाहिदच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शाहिद मागे वळतो आणि पापाराझींवर ओरडतो. शाहिद हा फोटोग्राफर्सला म्हणतो, ‘तुम्ही पुन्हा पुन्हा का ओरडता? मी इथे उभा आहे. ओरडू नका. मी गाडीत बसून गेल्यानंतर ओरडा आता, शांत राहा.’ शाहिदच्या या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

शाहिदच्या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘भाऊ, खरंच हे लोक खूप इरिटेड करतात.’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,’तो खरा कबीर सिंह बनून सर्वांना मारेल.’ शाहिदच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. शाहिद लवकरच मोठ्या पडद्यावर कृती सेननसोबत (Kriti Sanon) रोमान्स करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी शाहिद आणि कृती यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले, ज्यामध्ये दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही, मात्र चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

गेल्या वर्षी शाहिद हा जर्सी (Jersey) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील शाहिद आणि मृणाल ठाकूर (Mrinal Thakur) यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर त्याची फर्जी (Farzi) ही वेब सीरिज (Web Series) रिलीज झाली. या वेब सीरिजमधील शाहिदच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. काही दिवसांपूर्वी त्याचा ब्लडी डॅडी (Bloody Daddy) हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला.

हे ही वाचा: 

 ‘गदर २’ च्या ग्रँड सक्सेस पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी, शाहरुख खान-गौरी ते अजय- काजोल यांसह…

माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या मुलाच्या गाडीचा अपघात, वांद्रे-वरळी सी-लिंकवर …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Exit mobile version