छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात शाहिद कपूर साकारणार शिवरायांची भूमिका?

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचा आगामी 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात शाहिद कपूर साकारणार शिवरायांची भूमिका?

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचा आगामी ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटामुळे शाहिद सध्या चांगलाच चर्चेत आहे. शाहिदनं आतापर्यंत ‘कबीरसिंह’, ‘पद्मावत’, ‘जर्सी’ आणि ‘हैदर’सारखे अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं.आता शाहिदचा कल ऐतिहासिक चित्रपट करण्याकडे वळला आहे,असं म्हटलं जात आहे.

दरम्यान आता शाहिदच्या वाटेला एक बिग बजेट चित्रपट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहिद कपूर शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.शाहिद कपूरने जॅकी आणि वासु भगनानी यांच्या बिग बजेट सिनेमासाठी आपला होकार कळवला आहे. तसेच एका आगामी ऐतिहासिक चित्रपटात शाहिद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शाहिद कपूर आणि ‘ओएमजी 2’चे (OMG 2) दिग्दर्शक अमिर राय यांच्यासोबत आगामी प्रोजेक्टकरिता चर्चा सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असू शकतो. अश्विन वर्दे या सिनेमाची निर्मिती करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शाहिद कपूर आणि अश्विन यांचं छत्रपती शिवादी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमासंदर्भात बोलणं सुरू आहे. सकारात्मक गोष्टी घडत आहेत. त्यामुळे लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल”. 

शाहिद कपूर आणि निर्माते अनेक दिवसांपासून चांगल्या दिग्दर्शकाच्या शोधात होते. अशातच आता अमित राय यांना भेटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाचं दिग्दर्शन करण्यासाठी तसेच ती कथा ते व्यवस्थित मांडू शकतील अशी खात्री शाहिद कपूरला वाटते. छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य आणि पराक्रमाची या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमासाठी शाहिद कपूरने आपला होकार दिला आहे.  या चित्रपटाचं पेपर वर्क सुरु झाल्यानंतर या चित्रपटाची घोषणा केली जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय सिनेसृष्टीतील हा आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा असणार आहे. अद्याप या सिनेमाचं नाव समोर आलेलं नाही. सिनेप्रेक्षकांना आता या सिनेमाची प्रतीक्षा आहे.सध्या शाहिद  ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी व्यस्त आहे.. या चित्रपटात शाहिदसोबत कृती सेनन स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

७ फेब्रुवारीपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाण्याची शक्यता, प्रलंबित मागण्यांसाठी संप

चेहरा खरखरीत झाला असेल तर चेहऱ्यावर जायफळ लावण ठरेल फायदेशीर,जाणुन घ्या फायदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version