प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट झाला लीक, तेही HD प्रिंटमध्ये

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट झाला लीक, तेही  HD प्रिंटमध्ये

बॉलीवूड बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. तर या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच अनेकांनी अँडव्हान्स बुकिंग सुद्धा करून ठेवली असल्याची माहिती मिळाली होती. काही लोकांनी पहिल्या शो साठी अँडव्हान्समध्ये संपूर्ण सिनेमागृहच बुक करून ठेवल होता. हे अँडव्हान्स बुकिंग २० जानेवारीपासूनच सुरु झाले होते. शाहरुखच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पहिल्याच शोचे अँडव्हान्स बुकिंग करून ठेवले होते. त्यात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या पठाण या सिनेमाची तिकिटे महागड्या किंमतीत विकले जात आहेत. तरीही चाहते हजारो रुपये खर्च करून सिनेमा पाहायला जात आहेत. पण पठाण चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पहिल्याच दिवशी निर्मात्यांना एक मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे. आज पठाण चित्रपटाचा पहिला दिवस असून आजच हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांचा पठाण हा चित्रपट आज सिनेमागृहात रिलीज झाला आहे. त्याचबरोबर आज हा चित्रपट १०० हुन अधिक देशात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासाठी ५ लाखांहून अधिक तिकिटांची विक्रमी अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाली आहे. त्यामुळे चित्रपटाचे निर्मात्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची आशा वाटत होती. कारण या आधी चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरून चित्रपटाचा देशभरातील अनेक हिंदू संघटनांनी विरोध केला होता. पण अ‍ॅडव्हान्स बुकिंगची संख्या पाहता निर्मात्यांना दिलासा मिळाला होता. त्यात आता निर्मात्यांना मोठा धक्काच बसला आहे. कारण शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा पठाण हा चित्रपट काही ऑनलाईन वेबसाईटवर लीक झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आणि या ऑनलाईन वेबसाईट्सवर पठाण चित्रपट हा HD प्रिंटमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे निर्मात्यांना मोठ नुकसान होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे निर्माते यशराज फिल्म (Yash Raj Films) कडून प्रेक्षकांना चित्रपटाला चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा पठाण हा फक्त हिंदीतच नाही तर तमिळ आणि तेलगूमध्येही प्रदर्शित झाला आहे.पण आता हा चित्रपट फिल्मीझिला (Filmyzilla) आणि फिल्मीफोरव्हॅप (Filmy4Wap) नावांच्या या वेबसाईटवर अवैधरित्या उबलब्ध करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

National Tourism Day 2023, तुम्हालाही पर्यटन करायला आवडते, तर जाणून घ्या कशी झाली सुरवात पर्यटनाची…

Republic Day 2023, प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत ड्रोन आणि पतंग उडवण्यास बंदी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version