spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमधील शाल्व किंजवडेकर झळकणार नव्या मालिकेत

एक मालिकेमधील प्रसिद्धी मिळाल्यांनतर बरीच कलाकार मंडळी एक चांगल्या भूमिकेच्या प्रतिक्षेमध्ये असतात. मग त्यासाठी थोडा वेळ का लागेना पण उत्तम भूमिकेच्या शोधामध्ये ते पाहायला मिळतात.

एक मालिकेमधील प्रसिद्धी मिळाल्यांनतर बरीच कलाकार मंडळी एक चांगल्या भूमिकेच्या प्रतिक्षेमध्ये असतात. मग त्यासाठी थोडा वेळ का लागेना पण उत्तम भूमिकेच्या शोधामध्ये ते पाहायला मिळतात. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमध्ये ओमच्या प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचलेला शाल्व किंजवडेकर देखील याच प्रतीक्षेत असलेला पाहायला मिळाला. मालिका संपल्यानंतर शाल्व कुठल्याही प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळाला नव्हता.

काही दिवसांपूर्वीच श्रेया डफळापुरकर झालेल्या साखरपुड्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत होता. यांनतर आता तो लवकरच मालिकेतून पुनरागमन करताना दिसणार आहे. एका शहरातील मुलगी गावामध्ये जाते आणि तेथे असलेल्या शेतकरी मुलाच्या प्रेमामध्ये पडते असे कथानक असलेली मालिका श्वेता शिंदे हिने प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. मधल्या काळामध्ये या मालिकेच्या कथानकावर चोरीचे आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे या मालिकेच्या बाबतीत अडचणी निर्माण झाल्या होत्या. या सर्व कठीण प्रसंगातून पुढे जात ही मालिका प्रेक्षकांच्या मनात जागा करून आहे.

या मालिकेमध्ये तिचा हा मित्र समंजस असल्याने तो त्यांच्या प्रेमाच्या आड येणार नाही याची खात्री वाटते. त्यामुळे मालिका पाहायला शाल्वच्या चाहत्यांना अधिकच रंगत चढणार आहे. श्वेता शिंदे यांच्या अनेक मालिका सुपर हिट झाल्या आहेत. मालिकेच्या कथानकात काही ना काही बदल करून प्रेक्षकांना मालिकेत गुंतवण्यामध्ये त्या नेहमीच यशस्वी ठरल्या आहेत.

हे ही वाचा : 

अरबी समुद्रातील संशयास्पद बोटीचा पाकिस्तानी कनेक्शन नसल्याचा दावा

Ram Navmi 2023, ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss