spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘हर हर महादेव’ मध्ये बाजीप्रभूंच्या भूमिकेत दिसणार शरद केळकर, फर्स्ट लूक आला समोर…

झी स्टुडिओजने बाजी प्रभू देशपांडेच्या भूमिकेत दिसणारे अभिनेता शरद केळकर यांचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा प्रेरणादायी असून त्यांनी नेहमीच ‘स्वराज्य’चा धडा प्रत्येक पिढीला शिकवला आहे.

पश्चिम भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या काळातील आणि आजच्या काळातील महान राजांपैकी एक आहे आणि शिवाजी महाराजांच्या याच अतुलनीय शौर्याचा, त्यागाची, मैत्रीची आणि अमर्याद धैर्याची एक कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

झी स्टुडिओजने बाजी प्रभू देशपांडेच्या भूमिकेत दिसणारे अभिनेता शरद केळकर यांचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. ‘हर हर महादेव’ हा नवाकोरा चित्रपट अखेर २५ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. त्यामुळे दिवाळी आणि दिवाळीतील सुट्टी प्रेक्षकांसाठी खूपच मनोरंजक ठरणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तेलगू, तामिळ आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘हर हर महादेव’ या महान मंत्राचा जप करत बाजी प्रभू देशपांडे यांनी सिद्दी जौहरच्या सैन्याशी लढा देत प्राणाची आहुती देऊन घोड खिंडीला पावन केले. बाजी प्रभूंच्या करारी बाण्याची गाथा ‘हर हर महादेव’ चित्रपटात अतिशय भव्य आणि दिव्य रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मोशन पोस्टरमधील शूर बाजी प्रभूच्या भूमिकेत शरद केळकरचा आवाज आपल्याला पोस्टरवरून नजर हटवू देत नाही “जोपर्यंत तोफेचा आवाज ऐकू येत नाही, आई विंजाईची शपथ, कोणीही गनिम ही खिंड ओलांडू शकणार नाही… हा शब्द आहे बाजींचा.”

ZEE स्टुडिओज निर्मित आणि अभिजीत देशपांडे दिग्दर्शित. हा चित्रपट २५ ऑक्टोबर २०२२ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हे ही वाचा:

‘पुरुषार्थ हे पुस्तक उद्धव ठाकरेंना दिलं पाहिजे’ – नारायण राणे

माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न ; भुजबळांनी आरोप फेटाळले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss