इंस्टाग्राम स्टोरीद्वारे व्हिडिओ शेअर करत, कंगनाने केला महेश भट्ट यांच्या खऱ्या नावाचा खुलासा

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत Bollywood actress Kangana Ranaut) तिच्या बोल्ड स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. नेहमीच तिच्या वक्तव्याची चर्चा हि होत असते.

इंस्टाग्राम स्टोरीद्वारे व्हिडिओ शेअर करत, कंगनाने केला महेश भट्ट यांच्या खऱ्या नावाचा खुलासा

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत Bollywood actress Kangana Ranaut) तिच्या बोल्ड स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. नेहमीच तिच्या वक्तव्याची चर्चा हि होत असते. अभिनेत्रीने आता पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. अभिनेत्री कंगना रनौतने आता निर्माते, दिग्दर्शक महेश भट्ट (Producer, Director Mahesh Bhatt) यांच्यावर आरोप केलेत.. महेश भट्ट यांचा जुना व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री कंगना रनौतने त्यांच्यावर निशाणा साधलाय.. महेश यांचं खरं नाव महेश नसून ‘अस्लम’ (Aslam) आहे.. असं कंगनाने म्हटलंय.

कंगनाने तिच्या इंस्टग्राम स्टोरीवर लिहिले की, ‘महेश भट्ट यांनी त्यांचे खरे नाव वापरावे आणि कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व करू नये. जेव्हा की त्यांनी ‘धर्मांतर’ केले आहे.” महेश भट्ट यांनी त्याचे खरे नाव आणि इस्लामबद्दलच्या भावना व्यक्त केल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा जुना व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री कंगना रनौतने त्यांच्यावर निशाणा साधलाय.. महेश यांचं खरं नाव महेश नसून अस्लम आहे.. असं कंगनाने म्हटलंय. इतकं सुंदर नाव का लपवत आहात, असा खोचक सवालही कंगनाने महेश भट्ट यांना केला आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये महेश भट्ट यांचे व्हिडीओ शेअर केला आहे.

महेश भट्टसोबत कंगनाचा वाद खूप जुना आहे. कंगनाने २००६ मध्ये आलेल्या ‘गँगस्टर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाची निर्मिती महेश भट्ट यांनी केली होती. मात्र, यानंतर महेश भट्ट यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. २०२० मध्ये अभिनेत्रीने महेश भट्ट यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. दरम्यान महेश भट्ट यांची मुलगी निर्माती-अभिनेत्री पूजा भट्ट दिग्दर्शित ‘झोका’ चित्रपट तिने नाकारल्यानंतर अभिनेत्रीने हा आरोप केला होता. एवढंच नाही तर महेश भट्ट यांची दुसरी मुलगी अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यावरही तिनं जोरदार हल्ला चढवला. ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान कंगनानं आलियाची सिनेमातील कास्टिंग ही सर्वात मोठी चूक असल्याचं म्हटलं होतं. तसंच त्याने आलिया भट्टला ‘डॅडीज एंजल’ आणि महेश भट्ट यांना चित्रपट माफिया म्हटलं होतं.

हे ही वाचा:

‘बॉयकॉट बॉलीवूडच्या’ ट्रेंडमध्ये, ४०० कोटींचा ‘ब्रम्हास्त्र’ चे नक्की होणार तरी काय ?

‘… ४५ हून जास्त जागा निवडून आणण्याचं लक्ष्य ‘, चंद्रशेखर बावनकुळे

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version