spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

करण जोहरच्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार शशांक केतकर,पोस्ट केली शेअर

मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा बॉलीवूडमध्ये कल वाढताना दिसून येत आहे.

मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा बॉलीवूडमध्ये कल वाढताना दिसून येत आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकारांची आता हिंदी सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमवण्यासाठी जात आहेत.तर नुकतीच बातमी समोर आली आहे.आता लवकरच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा असलेला शशांक केतकरच्या नावाची बॉलिवूडमध्ये वर्णी लागणार आहे.शशांक केतकरने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअऱ केली. ती म्हणजे शशांक लवकरच करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन निर्मित एका नव्या सीरिजमध्ये दिसणार आहे. शो टाईम असे या सीरिजचे नाव आहे. ही सीरिज येत्या ८ मार्चला रिलीज होणार आहे.

शशांक केतकर हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो.तो त्याचे फोटो ,व्हिडिओ तर शेअर करत असतोच,मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याचे वक्तव्य देखील व्यक्त करत असतो.दरम्यान आता शशांकने धर्मा प्रॉडक्शन ऑफिसमधला एक फोटो शेअर करत लिहिले की, “८ मार्चपासून हॉटस्टारवर ‘शो टाइम’ पाहायला विसरू नका. जेव्हा मी धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी गेलो तेव्हाच जाणवलं ‘कुछ कुछ होता है’ माझी भूमिका छोटी आहे पण, प्रेक्षकांना ती भूमिका नक्कीच लक्षात राहिल.” म्हणजेच काय तर शशांकला करण जोहरच्या सिरीजमध्ये भूमिका साकारायला मिळत असल्यामुळे तो प्रंचड आनंदी आहे.

शो टाइम या सीरिजबद्दल बोलायचे झाल्यास त्यात मौनी रॉय, इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल, श्रिया सरन हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसतील.दरम्यान या सिरीजमध्ये आपला मराठमोळा चेहरा पाहायला मिळणार असल्यामुळे या सीरिजमधील शशांकची भूमिका पाहण्याचासाठी त्याचे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत.

शशांक केतकर हा छोट्या पडद्यावरील होणार सून मी या घरची या मालिकेमुळे त्याला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर हे मन बावरे या मालिकेत देखील शशांकने महत्तवाची भूमिका साकारली.आता सध्या तो स्टार प्रवाहवरील मुरांबा या मालिकेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतोय.या मालिकेत शशांक अक्षयची भूमिका साकारत आहे.दरम्यान आता शशांकच्या चाहत्यांमध्ये त्याच्या आगामी हिंदी सिरीजची प्रतिक्षा आहे.

हे ही वाचा: 

अशोक चव्हाण आदर्श घोटाळा लपवण्यासाठी भाजपमध्ये गेले; उद्धव ठाकरेंनी केली चव्हाणांवर टीका

Ashok chavan यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर Devendra Fadnavis म्हणाले, आगे आगे देखिए, होता है क्या…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss