शी हल्क: ऍटर्नी ऍट लॉ ओटीटीवर रिलीज: तारीख, कुठे पाहायचे, कास्ट आणि प्लॉट

She-Hulk: Attorney at Law ची भारतात रिलीजची तारीख 18 ऑगस्ट 2022 आहे

शी हल्क: ऍटर्नी ऍट लॉ ओटीटीवर रिलीज: तारीख, कुठे पाहायचे, कास्ट आणि प्लॉट

शी हल्क: ऍटर्नी ऍट लॉ

आय एम ग्रूट (I am Groot), मून नाईट (Moon Knight), मिस मार्वल (Ms Marvel) असा विविविध सिरीजनंतर MCU सिरीजची अजून एक सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शी हल्क: ऍटर्नी ऍट लॉ (She-Hulk: Attorney at Law) ही अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर कॉमेडी (Action, Adventure, Comedy) मालिका लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.या मालिकेच्या रिलीजनंतर सर्व मार्वल चाहते या मालिकेची वाट पाहत आहेत.

MCU मालिका शी हल्क: ऍटर्नी ऍट लॉ(She-Hulk: Attorney at Law) ची भारतात रिलीजची तारीख 18 ऑगस्ट 2022 आहे. गुरुवारी दुपारी 12:30 वाजता हि मालिका रिलीज होणार आहे. चाहते त्यांच्या डिजनी प्लस हॉटस्टार (Disney+ Hotstar) च्या सदस्यत्वासह या अमेरिकन मालिकेच्या शी हल्क: ऍटर्नी ऍट लॉ (She-Hulk: Attorney at Law) च्या प्रत्येक भागाचा आनंद घेऊ शकतात.

डिस्ने+ मालिका She-Hulk: Attorney at Law च्या कलाकारांबद्दल बोलायचे तर चार्ली कॉक्ससह (Charlie Cox) अनेक उत्तम कलाकार या मालिकेत आहेत. जेनिफर वॉल्टर्स/शे-हल्कच्या भूमिकेत तातियाना मस्लानी (Tatiana Maslany), टायटानियाच्या भूमिकेत जमीला जमील(Jameela Jamil), मॅलरी बुकच्या भूमिकेत रेने एलिस गोल्ड्सबरी (Rene Elise Goldsbury), मॅट मर्डॉक/डेअरडेव्हिलच्या भूमिकेत चार्ली कॉक्स(Charlie Cox), वोंग जोश वोंगच्या भूमिकेत बेनेडिक्ट(Benedict), ऑगस्टस पगच्या भूमिकेत सेगारा(Segara) आणि निकी रामोसच्या भूमिकेत जिंजर गोंजागा(Ginger Gonzaga) दिसणार आहेत.

या अमेरिकन मालिकेचे कथानक जेनिफर वॉल्टर्सच्या जीवनाभोवती फिरते. एक वकील जो सुपरह्युमन्सच्या कायदेशीर समस्या हाताळत असते. पण जेव्हा तिचा चुलत भाऊ ब्रूस बॅनरच्या (Bruce Banner) रक्ताशी क्रॉस – कंटॅमिन झाल्यानंतर, तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते आणि तिचे 6 फूट 7 इंचाच्या राक्षसात रूपांतर होते.दुसरीकडे, जेनिफर(Jeniffer), तिच्या स्वत: च्या विशेष क्षमतेचा स्वीकार करण्यास तयार नाही आणि वयाच्या 30 व्या वर्षी तिच्या आयुष्यात झालेल्या या बदलासह कठीण जीवनशैली सुरू ठेवण्यासाठी संघर्ष करते.

हे ही वाचा:

जॅकलिन फर्नांडिस वर खंडणी प्रकरणी आरोपपत्र दाखल

Exit mobile version