spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शहनाज गिल नववधूच्या वेशात; फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल

अभिनेत्री शहनाज गिलने नुकताच रॅम्पवर डेब्यू केला आहे. शहनाजने तिच्या पहिल्याच रॅम्प वॉकपासून सोशल मीडियावर वर्चस्व गाजवलं आहे.

पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळख असलेली बिग बॉस हिंदी कार्यक्रमातील स्पर्धक शहनाज गिल नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिच्या सौंदर्यामुळे तर कधी तिच्या क्यूट स्टाइलमुळे. अभिनेत्री शहनाज गिलने नुकताच रॅम्पवर डेब्यू केला आहे. शहनाजने तिच्या पहिल्याच रॅम्प वॉकपासून सोशल मीडियावर वर्चस्व गाजवलं आहे. लाल लेहेंग्यामधील वधूच्या रुपात शहनाजचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
ब्रायडल लूकमधील शहनाजचे शो स्टॉपर म्हणून अनेकांनी कौतुक केले आहे. लाल लेहेंगा, कपाळावर बिंदी, नथ, झुमका, कुंदन हार, गजरा आणि बांगड्या घातलेली शहनाज फोटो मध्ये एका नववधूप्रमाणे दिसतेय. शहनाज गिलचे वधूच्या लूक मधील हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. शहनाज आणि तिच्या चाहत्यांनी इंस्टाग्रामवर रॅम्प वॉकचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये नुकत्याच पार पडलेल्या फॅशन शोमध्ये शहनाजने शो-स्टॉपर म्हणून हजेरी लावली. तिच्या करिअरमधील हा पहिलाच रॅम्प वॉक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. रॅम्पवॉक करताना शहनाज खूप आनंदी दिसतेय. रॅम्पवॉक हा व्हिडीओ शहनाजने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिचे फोटोज चाहत्यांना खूप आवडले असून त्यावर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

Latest Posts

Don't Miss