क्रिती सॅनॉनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ‘शेहजादा’ आणि ‘भेडिया’ सिनेमाच्या कलाकारांनी केला वाढदिवस साजरा

क्रिती सॅनॉनचा वाढदिवस आज असून तिच्यावर अनेक चाहत्यांकडून तसेच बॉलीवूडमधील कलाकारांकडून सोशियल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.

क्रिती सॅनॉनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ‘शेहजादा’ आणि ‘भेडिया’ सिनेमाच्या कलाकारांनी केला वाढदिवस साजरा

मिमी आणि लुक्का छुपी अशा या सिनेमातील आपल्या अभिनयाने लोकांना भुरळ घालणाऱ्या परम सुंदरीचा म्हणजेच क्रिती सॅनॉनचा वाढदिवस आज असून तिच्यावर अनेक चाहत्यांकडून तसेच बॉलीवूडमधील कलाकारांकडून सोशियल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. ‘शेहजादा’ व ‘भेडिया’ हे तिचे आगामी चित्रपट असून, या सिनेमातील तिचे सहकलाकार कार्तिक आर्यन आणि वरून धवन यांनीसुद्धा क्रितीला  सोशियल मीडियावर पोस्ट लिहीत शुभेच्छा दिल्या आहेत.अभिनेता वरुण धवन क्रिती सॅनॉनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहितो कि, ‘नेहमीच तुला हसताना, आनंदीपणे तुझं जीवन जगताना आणि आयुष्यात नवनवीन ध्येय साध्य करताना पाहायचा आहे. लवकरच भेटूया’.

तर दुसरीकडे लुक्का छुपी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली जोडी म्हणजे कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनॉनची जोडी. सध्या हीच जोडी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या म्हणजेच शेहजादा या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर कार्तिक आर्यनने क्रितीला वाढदिवसाच्या शुभेच्छा शेहजादाच्या सेटवरून एक विडिओ शेअर केला आहे. ज्यात कार्तिक आर्यन क्रितीला केक भरवताना दिसत आहे.

तसेच या दोन सिनेमांव्यतिरिक्त क्रितिचे सैफ अली खान आणि प्रभास यांच्यासोबतचा आदिपुरुष आणि तर टायगर श्रॉफ सोबतचा गणपत हे सिनेमेदेखील भविष्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Exit mobile version