‘तारक मेहता का उल्टा चष्मा’बद्दल धक्कादायक बातमी! आता १४ वर्षांनंतर दिग्दर्शकानेही सोडला शो, कारण वाचून वाटेल आश्चर्य

ही १४ वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे होती. या शोमधून मी पैसा आणि प्रसिद्धी तर मिळवलीच पण मला माझी जीवनसाथी प्रियाही मला भेटली.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’बद्दल धक्कादायक बातमी! आता १४ वर्षांनंतर दिग्दर्शकानेही सोडला शो, कारण वाचून वाटेल आश्चर्य

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यांच्या सध्या सोप्या विनोदामुळे हा शो सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. गेल्या १४ वर्षात या शोमधील अनेक लोकप्रिय व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार बदलले आहेत, पण आजही प्रेक्षक त्यांच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. पण आता ज्याच्याकडे संपूर्ण शोचा कारभार होता त्यांनीच शो सोडला आहे. शोचे दिग्दर्शक मालव राजदा यांनी १५ डिसेंबर रोजी शेवटचा शो दिग्दर्शित केला.

हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोचे डायरेक्टर मालव राजदा आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये काही मतभेद होते, ज्यामुळे त्यांनी शो सोडला. मात्र, याबाबत मालव असे काहीही नसल्याचे सांगितले आहे. मालव म्हणाले, ‘जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर टीममध्ये क्रीटीव्ह मतभेद नक्कीच असतील, पण ते नेहमीच शोच्या भल्यासाठी असतं. प्रॉडक्शन हाऊसशी माझा काहीही संबंध नव्हता. मी फक्त शो आणि असित भाईचा आभारी आहे’. असित मोदी हे ह्या शोचे निर्माते आहेत.

जेव्हा मालव राजदाला शो सोडण्याचे कारण विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘१४ वर्षे शो शोचे दिग्दर्शन केल्यानंतर मला असे वाटले की मी कम्फर्ट झोनमध्ये आलो आहे. मी विचार केला की आपण आपली क्रीटीव्हिटी वाढवूया, यातून बाहेर पडू आणि स्वतःला आव्हान देऊया. ही १४ वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे होती. या शोमधून मी पैसा आणि प्रसिद्धी तर मिळवलीच पण मला माझी जीवनसाथी प्रियाही मला भेटली. मालवने इंस्टाग्रामवर नवीन वर्षाचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मागील वर्ष आनंदी असल्याचे वर्णन केले आहे.

हे ही वाचा:

अभिनेता शशांक केतकर असणार एका मोठ्या घोटाळ्याचा भाग, ‘त्या’ पोस्टमुळे आले चर्चांना उधाण

Shark Tank Season 2 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला , अश्नीर ग्रोव्हर आणि गझल अलघच्याजागी दिसणार हे परीक्षक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version