अनिता दाते ची धक्कादायक पोस्ट

माझ्या नवऱ्याची बायको या सुपरहीट मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते-केळकर हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या फोटोमुळे खळबळ उडाली आहे.

अनिता दाते ची धक्कादायक पोस्ट

अनिता दाते ची धक्कादायक पोस्ट

माझ्या नवऱ्याची बायको या सुपरहीट मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते-केळकर हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या फोटोमुळे खळबळ उडाली आहे.अभिनेत्री अनिता दातेच्या या फोटोला हार घालण्यात आला आहे. पण खुद्द अनिता दाते हिच्या इन्स्टा अकाऊंटवरुनच हा फोटो शेअर त्या फोटोवर जो आवडतो सर्वांना… अशी कॅप्शन दिलेली आहे. त्यामुळे हा फोटो पाहून बघणाऱ्यांना प्रथमदर्शनी अनेकांना धक्का बसत आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे स्वत: अनिता दाते हिनेच तिच्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. तसेच त्या फोटोला जो आवडतो सर्वांना अशी कॅप्शन दिली आहे. मात्र अनिता दाते हिने स्वत:च असा फोटो का शेअर केला, हा फोटो शेअर करण्यामागचं कारण अजून तरी समोर आलेलं नाही. पण या फोटोमुळे तिचे चाहतेच नाही तर इतर सेलिब्रिटींना देखील प्रश्न पडलाय की, नेमका या फोटो मागचा अर्थ काय?

या फोटोमागे कुठल्या नवीन प्रोजेक्टचे प्रमोशन आहे की आणखी काही अशी चर्चाही रंगली आहे. अनिता दातेची माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तर मी वसंतराव या चित्रपटामध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेत ती दिसली होती.

Exit mobile version