spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Taaza Khabar सचिन पिळगावकरची लेक झळकणार नव्या वेब सिरीजमध्ये, वेश्येच्या भूमिकेत श्रियानं आलियालाही टाकलं मागे

गिल्टी माइंड्स आणि द ब्रोकन न्यूजसारख्या वेब सीरिजमध्ये जबरदस्त भूमिका साकारणारी सचिन पिळगावकर (sachin pilgaonkar) कन्या श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) आता एका वेगळ्याच भूमिकेत दिसण्यासाठी सज्ज झाली आहे. सचिनची मुलगी श्रिया, जी हिंदी चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री होती, तिने शाहरुख खानसारख्या स्टारसोबत बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. शाहरुखच्या फॅन (२०१६) या चित्रपटात ती दिल्लीची अशी मुलगी बनली होती, जिच्यावर या खान स्टारचे प्रेम होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. पण श्रियाने आपल्या प्रगतीच्या मार्गाने पुढे जात चित्रपट, टीव्ही आणि ओटीटीमध्ये आपले काम सुरू ठेवले. पुढील वर्षी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणाऱ्या ‘ताजा खबर’ या मालिकेत श्रिया सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा : 

Today Gold Price भर लग्नसराईत सोन्याच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

श्रिया पिळगावकर तिच्या या भूमिकेविषयी बोलली की,”ताजा खबर (Taaza Khabar) सारख्या सीरिजमध्ये मी आहे याचा मला खूप आनंद होतोय. या भूमिकेसाठी मी खूप उत्साही देखील आहे,कारण वेश्येची भूमिका मी पहिल्यांदाच साकारते आहे. हा अनुभव माझ्यासाठी खूपच नवीन होता. लोकांनी मला ‘गिल्टी माइंड्स’ मध्ये वकीलाची आणि ‘द ब्रोकन न्यूज’ मध्ये पत्रकाराच्या भूमिकेत पाहिलं आहे, त्यामुळे मी भूवन बाम सोबत कॉमेडी जॉनर असलेल्या ‘ताजा खबर’ या सीरिजमध्ये एका वेश्येची भूमिका साकारताना खूप एक्सायटेड होती. माझ्या लूक सोबत आणि परफॉर्मन्ससोबत प्रयोग करणं खूप मजेदार अनुभव होता. त्यामुळे आता लोक या माझ्या भूमिकेला कसं स्विकारतील हे जाणून घेण्यास मी खूप उत्सुक आहे” असे श्रियाने म्हटले.

विवेक अग्निहोत्रींनी पठाण चित्रपटातील ‘या’ गाण्याच्या केलेल्या टिपण्णीवर, शाहरुखचे चाहते झाले नाराज

मिर्झापूरमधील स्वीटी, गिल्टी माइंड्समधील कशफ आणि ‘द ब्रोकन न्यूज’मधील ‘राधा’ या श्रिया पिळगावकरच्या याआधीच्या पात्रांना प्रेक्षकांनी दाद दिली आहे.

Latest Posts

Don't Miss