अभिनेता सिद्धार्थ बोडके करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

'गुम है किसीके प्यार मै' ह्या हिंदी मालिकेत सिद्धार्थ दिसून आला आहे.

अभिनेता सिद्धार्थ बोडके करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

अभिनेता सिद्धार्थ बोडके करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई : मराठी, हिंदी, नाटकांमधून पुढे आलेला अभिनेता “सिद्धार्थ बोडके” सध्या काय करत असेल? सिद्धार्थ ने याआधी ‘भय’ ‘नंबर्स’ ‘टाईम्स बरा वाईट’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पॉल टाकलं. ‘तू अशी जवळी रहा’, ‘अस्स सासर सुरेख बाई’, ‘असे हे ‘कन्यादान’ ‘नकुशी’ तरी हवीहवीशी’ ह्या मालिकांमधून सिद्धार्थ घराघरात पोहचला. ‘अनन्या’ या नाटकामधून सिद्धार्थ ने आपल्या अभिनयाची वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर मांडली.

 

हिंदीच म्हणाल तर सिद्धार्थने तिथे देखील आपला अभिनयाचे वेड प्रेक्षकांना लावले. ‘गुम है किसीके प्यार मै’ ह्या हिंदी मालिकेत सिद्धार्थ दिसून आला आहे. पण सध्या सिद्धार्थ काय करतोय याची उत्सुकता सगळ्यांना लागलीए. तर सध्या सिद्धार्थ बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. सिद्धार्थ आपलं पहिल पाउल बॉलीवूड मध्ये टाकणार आहे. स्वतः सिद्धार्थ ने सोशल मीडियावर या संबंधित पोस्ट केली होती.

सिद्धार्थ आगम सिनेमा ‘दृश्यम 2’ मधून आपल्या समोर येणार आहे. सध्या मराठीतले खूप कलाकार हिंदीमध्ये दिसले आहेत. आता सिद्धार्थचा देखील नंबर लागणार आहे. सिद्धार्थने “दृश्यम 2” या चित्रपटातील दोन नव्या भूमिकांसाठी ऑडिशन दिली आहे. त्यातील दुसऱ्या भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. असं सिद्धार्थ म्हणतोय.

हि भूमिका साकारताना एखाद्या कलाकाराला जितकं दडपण असतं तितकं दडपण होतं. मात्र दडपणापेक्षा इतक्या चांगल्या कलाकृतीत काम करण्याची उत्सुकता जास्त होती. यानिमित्ताने चित्रपटाला अधिक समजून घेता आलं. हिंदी चित्रपटाचं बजेट आणि त्यात काम करण्याच्या पद्धती जवळून पाहता आल्या. असं सिद्धार्थने एका मुलाखती दरम्यान सांगितलं. सिद्धार्थने हा चित्रपट म्हणजे एक सुंदर अनुभूती होती अशी भावना व्यक्त केली. सिद्धार्थ बॉलिवूड मध्ये देखील आपल्या अभिनयाचे वेड प्रेक्षकांना लावणार यात काही शंका नाही.

 

Exit mobile version