spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे खेळणार ‘एक डाव भुताचा’, अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटचा नवा चित्रपट ४ ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात

मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपूरे, सिद्धार्थ जाधव हे अष्टपैलू अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत. "दे धक्का" सारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत मकरंद अनासपूरे, सिद्धार्थ जाधव हे अष्टपैलू अभिनेते म्हणून सुपरिचित आहेत. “दे धक्का” सारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. आता “एक डाव भूताचा” या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपूरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकत्र आले असून, येत्या ४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले.

रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले,अक्षय कुलकर्णी,हर्षद नायबळ अभिनेत्री मयूरी देशमुख,अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते,रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.

सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे एकत्र म्हणजे पुरेपूर मनोरंजनाची हमी हे त्यांनी आजवर अनेकदा दाखवून दिलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही त्याचंच प्रतिबिंब दिसतं. एकंदरीत चित्रपटाचे पोस्टर पाहता टॉम अँड जेरीसारखा खेळ या चित्रपटात पाहायला मिळण्याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे मकरंद आणि सिद्धार्थच्या दमदार अभिनयासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हे ही वाचा:

Narayan Rane आणि त्यांचे चाराणे-बाराणे हे कळसुत्री बाहुल्या, मुख्य सूत्रधार Devendra Fadnavis: Sushma Andhare

मालवण मध्ये जे झाले ते महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रयत्न; Devendra Fadnavis गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss