spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच अडकणार लग्नबंधनात

बॉलीवूडच्या रोमँटिक (Romantic) कपल (Couple) कियारा अडवाणी(Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांच्या लग्नासाठी काही तसाच शिल्लक राहिले आहेत. कोटयावधी तरुणांच्या हृदयावर तिच्या सिनेमाद्वारे अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री कियारा आणि बॉलिवूडमधील 'मुंडा कुक्कड कमाल दा' सिद्धार्थ मल्होत्रा हे ६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.

बॉलीवूडच्या रोमँटिक (Romantic) कपल (Couple) कियारा अडवाणी(Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांच्या लग्नासाठी काही तसाच शिल्लक राहिले आहेत. कोटयावधी तरुणांच्या हृदयावर तिच्या सिनेमाद्वारे अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री कियारा आणि बॉलिवूडमधील ‘मुंडा कुक्कड कमाल दा’ सिद्धार्थ मल्होत्रा हे ६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. कियारा आणि सिद्धार्थ हे जैसलमेर मधील आलिशान सूर्यगड मध्ये त्याच्या परिवार आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये लग्न करण्याचे ठरवले आहे. ४ फेब्रुवारी रोजी दोघांच्या लग्नसोहळ्याचे विधी सुरु झाले आहेत. बॉलीवूड मधील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan), शाहिद कपूर (Shahid Kapoor) , वरून धवन (Varun Dhawan) असे बरेच कलाकार लग्नसोहळ्यात सहभागी होणार आहेत अश्या चर्चा चालू आहेत.

कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांसाठी पॅलेसमध्ये ८४ आलिशान खोल्या बुक केल्या आहेत. शाही पद्धतीने हे लग्न होणार आहे. जिथे दोन्ही स्टार्स आणि त्याचे कुटूंबही पोहोचले आहेत. या स्टार कपलच्या लग्नाच्या सुरुवात विधी ५ फेब्रुवारीला होणार आहे.आणि दोघेही 6 फेब्रुवारी २०२३ रोजी सूर्यगड पॅलेसमध्ये त्यांचे कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांसमोर लग्न बंधनात अडकणार आहे. दरम्यान, या स्टार कपलच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही मोठी बातमी बनत आहे. आता अशी चर्चा चालू आहे कि लग्नानंतर लगेच सिद्धार्थ आणि कियारा अडवाणी हे दोघेही ड्रीम हनिमून साठी निघू शकणार नाही. कारण सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा हे दोघेही त्याच्या वर्क कमिटमेंट्समध्ये बांधले गेले आहेत. त्यामुळे ते त्याच्या हनिमून चे प्लांनिंग लगेच करू शकणार नाही.

सिद्धार्थ मल्होत्रा हा आता रोहित शेट्टी च्या नवीन वेब सिरीज कॉप युनिव्हर्स(Cop Universe) मध्ये दिसणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त रिलीज चित्रपट मिशन मजनू बद्दल चर्चेत आहे. तर अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच अभिनेता कार्तिक आर्यन सोबत ‘सत्य प्रेम कि कथा ‘ या चित्रपटात दिसणार आहे. कियारा आणि सिद्धार्थ याना दोघांचेही लग्न खूप गुपित ठेवायचे आहे. म्हणूनच त्यांनी खूप कमी लोकांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हे कपल त्याच्या कुटूंबाव्यतिरिक्त खूप खास मित्रांना लग्नासाठी आमंत्रित केले आहे.

हे ही वाचा:

Valentine Day 2023, तुमचं Long Distance Relationship आहे? तर अश्या पद्धतीने साजरा करा तुमचा Valentine Day

Valentine Week 2023 Full List, रोज डे ते किस डे पर्यंत जाणून घ्या सर्व तारखा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss