सिध्दार्थ मल्होत्राने कियारा अडवानीला केले रोमँटिक अंदाजात बर्थडे विश

सिध्दार्थ मल्होत्राने कियारा अडवानीला केले रोमँटिक अंदाजात बर्थडे विश

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने 31 जुलै म्हणजेच रविवारी तिचा वाढदिवस साजरा केला. कियाराच्या वाढदिवसाचा आनंद सोशल मीडियावर पाहायला मिळाला. बॉलिवूड सेलिब्रिटींसह तिच्या चाहत्यांनी देखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र सर्वांना प्रतीक्षा होती ती कियाराचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा याने तिला शुभेच्छा देण्याची. अखेर सर्वांची प्रतीक्षा संपली आणि रात्री उशिरा कियारा अडवाणीला सिद्धार्थ मल्होत्राने शुभेच्छा दिल्या. सिद्धार्थ मल्होत्राने सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडिओ शेअर करत अगदी रोमँटिक अंदाजात कियाराला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थ मल्होत्राने कियारा आडवाणीला Ki म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कियाराला विश करताना सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या इन्टाग्राम स्टोरीला शेयर केलेला व्हिडिओ दुसरा तिसरा कोणताही व्हिडिओ नसून कियारा आणि सिद्दार्थच्या शेरशहा सिनेमाच्या प्रोमोशनच्यावेळीचा व्हिडिओ आहे. वाढदिवसाची ही विश पाहून कियाराही स्वतःला रोखू शकली नाही. तिनेही हार्ट ईमोजी पाठवत सिद्धार्थ मल्होत्राचे आभार मानले आहेत.

सिद्धार्थ मल्होत्राने कियाराचा वाढदिवस दुबईत साजरा केल्याचे वृत्त आहे. दोघांच्याही फॅन पेजवर दोघांचे फोटो शेअर करण्यात आले होते. याआधी दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण इंस्टा स्टोरी आणि दोघांच्या रोमँटिक चर्चांमुळे या बातम्या थांबल्या आहेत. शेवटी दोघांनीही जाहीरपणे आपले प्रेम व्यक्त केले आहे.जूनमध्ये रिलीज झालेल्या ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटात कियारा अडवाणी वरुण धवनसोबत दिसली होती. आता कियारा अडवाणी ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

 

Exit mobile version