spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तरुणाईला भुरळ पाडणारं अवधूत गुप्ते यांच्या ‘दूर दूर’ गाण्याचा टिझर प्रदर्शित

मराठीतले रॉकस्टार म्हणुन अवधूत गुप्ते यांची ओळख आहे.त्यांच प्रत्येक गाणं हे तरुणाईला थिरकायला लावणारचं असतं.

मराठीतले रॉकस्टार म्हणुन अवधूत गुप्ते यांची ओळख आहे.त्यांच प्रत्येक गाणं हे तरुणाईला थिरकायला लावणारचं असतं.अवधूत गुप्ते यांच्या गाण्यात एक ठसका असतोच.त्यांनी आतापर्यंत गायलेल्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.अशातच आता अवधूत गुप्ते यांच्या ‘विश्वामित्र’ या अल्बममधील ‘विश्वामित्र’, ‘तुझ्या विना’ या श्रवणीय गाण्यांनंतर आता ‘दूर दूर’ हे तिसरे बहारदार गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.अवधूत यांच्या ‘विश्वामित्र’,आणि ‘तुझ्या विना’ या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

दरम्यायान  ‘दूर दूर’ या  गाण्याचा जबरदस्त टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. अवधूत गुप्ते यांचे संगीत, बोल असलेल्या ‘दूर दूर’  या गाण्याला आवाजही त्यांचाच लाभला आहे.सध्या आता सगळीकडेच प्रेमाचे वारे वाहत आहेत.व्हॅलेंटाईन डे जवळ आला आहे.तर याचचं निमित्त साधून हे प्रेममय गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे.प्रेमात पडलेल्या प्रत्येकालाच आजूबाजूला ‘त्या’ खास व्यक्तीचा भास होतो. परंतु कधी कधी ‘त्या’ व्यक्तीला विसरण्याचा प्रयत्न केला तरी सर्वत्र तीच व्यक्ती दिसते. प्रेमातील हीच तळमळ या गाण्यातून व्यक्त होत आहे. अवधूत गुप्ते यांची खासियत या गाण्यातून दिसत असून उडत्या चालीचे हे गाणे सगळ्यांनाच आवडेल असे आहे. याचे सादरीकरणही उल्लेखनीय आहे. एकविरा म्युझिक  प्रस्तुत ‘विश्वामित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी असून येत्या ९ फेब्रुवारीला ‘दूर दूर’ गाणे प्रदर्शित होणार आहे.

या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, ” जिव्हाळा, आठवणी, दुरावा, भास या सगळ्या गोष्टींचा माणूस प्रेमात अनुभव घेतो. हे सगळे अनुभव दाखवणारे ‘दूर दूर’ हे गाणे आहे. मनाला भावतील असे या गाण्याचे बोल आहेत. सर्वत्र तिचाच भास होत असल्याचे या गाण्यातून सांगण्यात येत आहे. जुन्या प्रेमाची आठवण करून देणारे, , एकांतात ‘ती’ची आठवण करून देणार हे गाणे आहे. हे गाणे माझ्या दोस्तांना नक्कीच आवडेल.”दरम्यान जुन्या प्रेमात रमणारं असं हे गाणं असणार आहे.त्यामुळे अवधुत यांचे चाहते या गाण्यासाठी उस्तुक आहेत.

हे ही वाचा:

काय असेल शरद पवार गटाच्या नव्या राजकीय पक्षाच नाव? सूर्यफूल, उगवता सूर्य…

सोलापूर विद्यापीठाचा बोगस कारभार, ५० पैकी ९९ मार्क दिल्याने विद्यार्थ्यंमध्यें गोंधळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss