Wednesday, July 3, 2024

Latest Posts

Sonakshi Sinha ने नेसली ४४ वर्षा पूर्वीची साडी ? जुन्या साडीची रहस्य काय ?

सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले त्यात आई वडिल आशिर्वाद देताना देखील दिसून आले. पण त्यात एका गोष्टीने सर्वाचंच लक्ष वेधून घेतलं. 

नुकतचं दबंग गल आणि ‘असली सोना’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीचा लग्न सोहळा पार पडला. सोनाक्षी सिन्हा(sonakshi sinha) ही तिच्या लग्न सोहळ्यावरुन अनेक दिवसांपासून चर्चेत होती. आंतरजातीय विवाह करत असल्याने वडिल शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha) आई पुनम सिन्हा(poonam sinha) आणि भाऊ लव- कुश(Love-kush) हे नाराज असल्याचं समजलं.वयाच्या ३७ व्या वर्षी सोनाक्षी बोहल्यावर चढली. सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले त्यात आई वडिल आशिर्वाद देताना देखील दिसून आले. पण त्यात एका गोष्टीने सर्वाचंच लक्ष वेधून घेतलं.

सोनाक्षीने तिच्या लग्नात जबरदस्त असा लूक केला होता. लाल रंगाची साडी, कानात झुमके आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. पांढऱ्या रंगाची साडी, खड्याचं नेकलेस केसात गजरा असा नवा अंदाजाचा लूक तिने केला होता. पण खास गोष्ट म्हणजे ४४ वर्ष जुनी असलेली साडी सोनाक्षीने आपल्या लग्नात नेसली होती. ही साडी तिची आई पूनम सिन्हा यांची होती. ४४ वर्षापूर्वी  शत्रुघ्न सिन्हा(shatrughan sinha) आणि पुनम सिन्हा(poonam sinha) यांची लग्नगाठ जुळली आणि त्यावेळी पुनम सिन्हा यांनी आपल्या लग्नामध्ये जी साडी नेसली होती ती साडी सोनाक्षीने तिच्या लग्नामध्ये नेसली. या साडीची किंमत ७८ हजार इतकी आहे.

सोनाक्षीसोबत तिच्या नवऱ्याने सफेद रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. या दोघांच्या साध्या लूक मुळे दंबग गर्ल ही पुन्हा एकदा चर्चेत आली. सोनाक्षी आणि झहिर हे दोघे ही गेल्या ७ वर्षापासून एकमेकांना डेट करत होते.सोनाक्षी आणि जहीर हे हिंदू-मुस्लिम असल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले तर दुसरीकडे काही लोकांनी त्यांच्या लग्नावर आक्षेप घेतला होता. त्यांच्या विवाहाला सुरुवातीपासून कुटुंबियाकडून विरोध होत होता आधी नकार दिला आणि त्यानंतर आता लग्नसोहळ्यात हजेरी लावली आणि लग्नसोहळ्यात कुटुंबियांना एकत्र बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

हे ही वाचा

आरोग्यमंत्र ; पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे जीवन कसे बदलून जाते ?

चला शिकुयात पावसाळ्यातील एक नवा पदार्थ ..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss