Sunday, June 30, 2024

Latest Posts

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal यांचे दोन वर्षांपूर्वी साखरपुडा झाला होता?, नेटकऱ्यांनी शोधले अभिनेत्रींचे जुने फोटो

नुकतचं दबंग गल आणि ‘असली सोना’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीचा लग्न सोहळा पार पडला. सोनाक्षी सिन्हा(sonakshi sinha) ही तिच्या लग्न सोहळ्यावरुन अनेक दिवसांपासून चर्चेत होती.

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal Engagement : नुकतचं दबंग गल आणि ‘असली सोना’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीचा लग्न सोहळा पार पडला. सोनाक्षी सिन्हा(sonakshi sinha) ही तिच्या लग्न सोहळ्यावरुन अनेक दिवसांपासून चर्चेत होती. आंतरजातीय विवाह करत असल्याने वडिल शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha) आई पुनम सिन्हा(poonam sinha) आणि भाऊ लव- कुश(Love-kush) हे नाराज असल्याचं समजलं. वयाच्या ३७ व्या वर्षी सोनाक्षी बोहल्यावर चढली. सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले. तब्ब्ल सात वर्षांच्या नात्यानंतर या जोडप्याने आपले नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. २३ जून रोजी झहीर आणि सोनाक्षीचे लग्न झाले. या जोडप्याने दुपारी नोंदणीकृत विवाह केला. ज्यामध्ये त्याचे कुटुंबीय आणि खास मित्रांनी सहभाग घेतला होता. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सोनाक्षी आणि झहीरचा त्यांच्या लग्नादरम्यानचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो त्यांच्या एंगेजमेंटचा असल्याचे बोलले जात आहे. सोनाक्षीच्या इंस्टाग्रामवरूनच युजर्सनी हा फोटो शोधला आहे.

सोनाक्षीने नुकतेच तिच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो शेअर केले आहेत ज्यात ती तिची एंगेजमेंट रिंग फ्लाँट करताना दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी सोनाक्षीने तिचा असाच अंगठी फ्लाँट करतानाचा फोटो शेअर केला होता. ज्यानंतर चाहत्यांना असे वाटते की हा फक्त त्यांचा एंगेजमेंट फोटो आहे. मे २०२२ मध्ये सोनाक्षी सिन्हाने स्वतःचा एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती हिऱ्याची अंगठी घालताना दिसली होती. फोटोमध्ये सोनाक्षी कोणाचा तरी हात धरून उभी आहे आणि हसताना दिसत आहे. मात्र, फोटोमध्ये ती कोणाच्या खांद्यावर डोके ठेवून पोज देत आहे हे स्पष्ट झालेले नाही. फोटो शेअर करताना सोनाक्षीने लिहिले होते- ‘माझ्यासाठी मोठा दिवस!!! माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी थांबू शकत नाही. सोनाक्षीने जेव्हा ही पोस्ट शेअर केली तेव्हा लोकांना वाटले की ती कोणत्यातरी ब्रँडची जाहिरात करत आहे. पण आता लोक म्हणतात की हा त्यांचा एंगेजमेंट फोटो आहे. मात्र, आतापर्यंत सोनाक्षी आणि झहीर दोघांनीही दोन वर्षांपूर्वी एंगेजमेंट केली होती की नाही याची पुष्टी केलेली नाही.

हे ही वाचा

आरोग्यमंत्र ; पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे जीवन कसे बदलून जाते ?

चला शिकुयात पावसाळ्यातील एक नवा पदार्थ ..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss