सोनाली बेंद्रेच्या ‘छम छम करता है…’ गाण्याला राज ठाकरेंनी दिली चाल? अमेरिकेत झाला खुलासा…

दिनांक २८ जून २०२४ रोजी अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या वर्षीच्या अधिवेशनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena - Raj Thackeray) उपस्थित आहेत.

सोनाली बेंद्रेच्या ‘छम छम करता है…’ गाण्याला राज ठाकरेंनी दिली चाल? अमेरिकेत झाला खुलासा…

काल दिनांक २८ जून २०२४ रोजी अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या वर्षीच्या अधिवेशनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena – Raj Thackeray) उपस्थित आहेत. यावेळी तिथे राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत ही घेण्यात आली आहे. अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली.

हे ही वाचा : जिथे दोन मराठी माणसं एकत्र येतील तिथे त्यांनी एकमेकांशी…काय म्हणाले Raj Thackeray? 

महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे राज ठाकरे. हुबेहूब बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) कॉपी असलेले पुतणे राज ठाकरे (Raj Thackeray) आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (Maharashtra Navnirman Sena Cheif) आहेत. आजही लोकांना त्यांच्यात बाळासाहेब दिसतात. लहानपणापासून काकांसोबत काम करून त्यांनी बाळासाहेबांचे काही गन अगदी जसेच्या तसे उचलले. अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशनात मुलाखत घेत असताना मुलाखतकार म्हणले आहेत की, हातामध्ये रंग आणि रेषा तर आहेतच पण अनेकांना माहित नाही की राज ठाकरे हे स्वतः उत्तम संगीत देऊ शकता. त्याच्या एका मित्राच्या चित्रपटाची एक चाल पहिल्यांदा राज ठाकरे यांनी गुणगुणून दाखवली दाखवली आणि त्यावर त्या मित्राने पुढचं गाणं केलं आणि ते गाणं म्हणजे छम छम करता है. यावर राज ठाकरे याची हसत शब्द माझंही नाहीत असे उत्तर हे दिले आहे. छम छम करता है.. या गाण्यात अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही दिसून येते. त्यामुळे आता पुन्हा एकदा सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्या नात्याच्या चर्चाना उधाण येण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंना आपण राजकारणी म्हणून ओळखत असलो तरी ,त्यांना असलेली कलेची, सिनेमांची आवड लपून राहिली नाहीये. त्यामुळं सिनेइंडस्ट्रीतल्या अनेक बड्या कलाकारांसोबत त्यांची मैत्री आहे. त्यांचा सिनेइंडस्ट्रीतला एक जवळचा मित्र म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला ‘अगं बाई अरेच्चा!’ हा सिनेमा चांगलाच गाजला. वेगळं कथानक असल्यानं २००४ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमाची क्रेझ आजही पाहायला मिळते. या सिनेमातलं ‘छम छम करता है’ हे गाणंही प्रचंड गाजलं. हे गाणं बॉलिवूड अभिनेत्री सोनाली ब्रेंद्रेवर चित्रीत करण्यात आलंय. खरं तर हा सिनेमा केला तेव्हा केदाश शिंदे इंडस्ट्रीत नवखे होते, त्याचं वय केवळ २८ वर्ष होतं. तसंच २००४ इतका मोठा सिनेमा बनवल्याचं सगळं श्रेय केदार शिंदे राज ठाकरे यांना देतात. तर “छम छम करता है गाण्यासाठी फराह खान आणि सोनाली बेंद्रेने राज ठाकरेंमुळे होकार दिला. त्यांच्या एका शब्दामुळे त्यांनी हा सिनेमा स्वीकारला.” तर या सिनेमातील ‘छम छम करता है’ या गाण्याला चाल ही राज ठाकरे यांनी दिली आहे.

राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे ९० च्या दशकात प्रेमसंबंधात होते असे आज ही म्हटले जाते. सोनाली बेंद्रेचा आग हा पहिला चित्रपट पाहून राज ठाकरे वेडे झाल्याचे बोलले जाते. दोघांचे प्रेम जोरात चालू होते. सोनाली बेंद्रेच्या फिल्मी करिअरला पुढे नेण्यासाठी राज ठाकरेंनीही खूप मदत केली होती, अश्या ही चर्चा केल्या जातात. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित अंग बाई अरेच्चा मधील ‘छम छम करता है…’ गाणं. बेंद्रे आणि राज ठाकरे दोघेही एकमेकांवर मनसोक्तपणे प्रेम करत होते आणि त्यांना लग्नही करायचे होते. मात्र यात सगळ्यात मोठी अडचण होती ती राज यांच्या बाजूने, कारण हे दोघे जेव्हा प्रेमात पडले तेव्हा राज यांचे लग्न झालेले होते. मात्र तरीही राज यांनी काही अंशी तयारी दाखवली होती.

Exit mobile version