Tuesday, September 24, 2024

Latest Posts

‘मानवत मर्डर्स’मध्‍ये सोनाली कुलकर्णी साकारणार रुक्मिणीची भूमिका, म्‍हणाल्‍या “मोठी जबाबदारी पार पाडत…

सहजसुंदर अभिनयासाठी ओळखल्‍या जाणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोनी लिव्‍हवरील आगामी मराठी ओरिजिनल सिरीज ‘मानवत मर्डर्स'मधील स्‍टार-स्‍टडेड कलाकारांबाबत आपला आनंद व्‍यक्‍त करत आहेत.

सहजसुंदर अभिनयासाठी ओळखल्‍या जाणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोनी लिव्‍हवरील आगामी मराठी ओरिजिनल सिरीज ‘मानवत मर्डर्स’मधील स्‍टार-स्‍टडेड कलाकारांबाबत आपला आनंद व्‍यक्‍त करत आहेत. ही रोमांचक थ्रिलर सिरीज १९७०च्‍या दशकात महाराष्‍ट्रातील ग्रामीण भागात घडलेल्‍या कुप्रसिद्ध हत्‍याकांडाला प्रकाशझोतात आणते. या सिरीजमध्‍ये प्रतिभावान कलाकारांसह राष्‍ट्रीय पुरस्‍कार-विजेते कलाकार देखील आहेत.

सोनाली यांनी रूक्मिणीच्‍या भूमिकेत आपली सखोलता व सर्वोत्तम अभिनयाची भर केली आहे. रुक्मिणी आपल्‍या पूर्ण न झालेल्‍या इच्‍छांची पूर्तता करण्‍यासाठी विलक्षण, घातक उपाययोजनांचा अवलंब करते. तिच्‍या प्रवासाबाबत सांगताना सोनाली म्‍हणाल्‍या, “ही भूमिका ऑफर करण्‍यात आल्‍यापासून आणि कथानक वाचल्‍यापासून मी या भूमिकेची सखोलता आणि मानवी मन कशाप्रकारे विलक्षण कृत्‍य करू शकते हे पाहून अचंबित झाले. ही भूमिका साकारताना मोठी जबाबदारी पार पाडत असल्‍यासारखे वाटले. मी रूक्मिणीचे पैलू परिपूर्णपणे सादर करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.” सोनाली प्रतिभावान दिग्‍दर्शक आशिष बेंडे आणि सह-कलाकार आशुतोष गोवारीकर, सई ताम्‍हणकर व मकरंद अनासपुरे यांच्‍यासोबत काम करण्‍याचा आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाल्‍या, “या सर्वांमध्‍ये अनोखी कौशल्‍ये आणि सर्जनशीलता आहे. ही उत्तम टीम आहे आणि या टीमने माझ्या भूमिकेमध्‍ये अधिक रोमांचची भर केली आहे. मी या लक्षवेधक कथानकाप्रती प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्‍यासाठी खूप उत्‍सुक आहे.”

स्‍टोरीटेलर्स नूक (महेश कोठारे व आदिनाथ कोठारे) निर्मित आणि गिरीश जोशी यांची निर्मिती असलेली सिरीज ‘मानवत मर्डर्स’चे दिग्‍दर्शक आशिष बेंडे आहेत. रमाकांत एस. कुलकर्णी यांची आत्‍मचरित्रात्‍मक कलाकृती ‘फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम’वर आधारित या सिरीजमध्‍ये आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्‍हणकर असे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. कॅलेंडरवरील ४ ऑक्‍टोबर तारखेवर खूण करून ठेवा आणि पहा थ्रिलर सिरीज ‘मानवत मर्डर्स’ फक्‍त सोनी लिव्‍हवर. ही सिरीज पाहायला चुकवू नका!

हे ही वाचा:

Akshay Shinde Encounter: आधी भरचौकात फाशी देण्याची मागणी मग आता त्या नराधमाविषयी एवढी आपुलकी कशी वाढली? Naresh Mhaske यांचा सवाल

Akshay Shinde Encounter: असे अजून दहा-पंधरा ठोकले तरी काय हरकत नाही पण…काय म्हणाले Nilesh Rane?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss