spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूरचा व्हिडीओ होतोय व्हायरल; करवा चौथची तयारीआणि …

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. सोनमचं सिने-करिअर भले फारसं काही चांगलं राहिलं नाही पण तिच्या फॅशन स्टाइलमुळे ती नेहमीच बातम्यांच्या हेडलाईनमध्ये राहिली. नुकतीच सोनम कपूर आई झाली आहे. त्यामुळे सध्या ती तिच्या बाळाबरोबर पालकत्वाचा आनंद घेतेय.

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. सोनमचं सिने-करिअर भले फारसं काही चांगलं राहिलं नाही पण तिच्या फॅशन स्टाइलमुळे ती नेहमीच बातम्यांच्या हेडलाईनमध्ये राहिली. नुकतीच सोनम कपूर आई झाली आहे. त्यामुळे सध्या ती तिच्या बाळाबरोबर पालकत्वाचा आनंद घेतेय. मात्र, सोनम सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनम करवा चौथसाठी तयार होण्याबरोबरच तिचा मुलगा वायूला स्तनपान (BreastFeeding) करतेय.

सोनमचा मुलगा तिच्या मांडीवर असून ती त्याला स्तनपान करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या दरम्यान तिचा मेकअप करणारी पूर्ण टीम तिच्याबरोबर दिसतेय. तसेच, सोनमचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. तसेच, सोनम लेहेंगा आणि ज्वेलरीमध्ये खूपच सुंदर दिसतेय. हा व्हिडिओ शेअर करताना सोनम कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या टीमसोबत खऱ्या जगात परतणे, कपडे घालून लोकांना भेटणे खूप छान आहे. आपल्या होम ग्राऊंडवर परतणे खूप छान आहे. Love U Mumbai #मुंबई.” सोनमला सशक्त आई म्हणत असताना, तिचा नवरा आनंद आहुजानेही तिचे कौतुक केले आहे. याआधीही अनेक महिलांनी आपलं काम सांभाळून आपल्या मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना स्तनपान केलं आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन राजकारणी Larissa Waters यांनी देखील सभागृहात स्तनपान केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

 तसेच सोनमने करवा चौथ व्रता संदर्भातील केलेल्या विधानामुळे सध्या चर्चेत आहे. सोनमच्या लग्नाला चार वर्ष झाली आहेत. पण तिनं आतापर्यंत कधीच करवा चौथ हे व्रत केलं नाही. आणि नुकतंच तिनं यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे. सोनम म्हणाली की तिचा पती आनंद आहूजामुळे ती हे व्रत करत नाही. सोनम कपूरनं साडीमध्ये आपले काही फोटो करवा चौथच्या दिवशी शेअर केले होते. या फोटोंना कॅप्शन देत सोनमनं लिहिलं की, ”माझे पती आनंद आहूजा करवा चौथच्या व्रताला मानत नाही. कारण त्यांना वाटतं की त्या व्रतासाठी स्त्रिया कडक उपवास ठेवतात त्यापेक्षा त्यांनी इंटरमिंटेंट डाएट(ठरलेल्या वेळेत थोडं-थोडं खाणे) करुन स्वतःची प्रकृती उत्तम ठेवायला हवी. त्यामुळे मी हे व्रत ठेवत नाही. पण आमच्या दोघांचा आपले सण-परंपरा यांवर विश्वास आहे. कारण या गोष्टी कुटंबाला एकत्र बांधून ठेवतात. मला खूप चांगलं वाटतं जेव्हा माझी आई खूप प्रेमाने-हौशेने हा सण साजरा करते. आणि मी जरी हे व्रत करत नसले तरी त्या परंपरेचा भाग मात्र मी नक्कीच बनते”. असं स्पष्ट मत व्यक्त करत सोनमने आपल्या चाहत्यांना करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

 सोनम कपूरनं आनंद आहूजासोबत २०१८ मध्ये लग्न केलं होतं. सोनमच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते. अनेक सेलिब्रिटींनी तिच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती. अनिल कपूर यांनी तेव्हा मीडियाचा देखील पाहुणचार चांगला केला होता ज्याचं खूप कौतूकही झालं होतं. २० ऑगस्ट,२०२२ रोजी सोनमनं आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला. सोनम आणि आनंद आहुजा यांच्या मुलाचं नाव वायु आहे.

हे ही वाचा:

‘हर हर महादेव’ मध्ये बाजीप्रभूंच्या भूमिकेत दिसणार शरद केळकर, फर्स्ट लूक आला समोर…

Ram Setu Trailer: अंगावर शहारे आणणारा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss