Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूरचा व्हिडीओ होतोय व्हायरल; करवा चौथची तयारीआणि …

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. सोनमचं सिने-करिअर भले फारसं काही चांगलं राहिलं नाही पण तिच्या फॅशन स्टाइलमुळे ती नेहमीच बातम्यांच्या हेडलाईनमध्ये राहिली. नुकतीच सोनम कपूर आई झाली आहे. त्यामुळे सध्या ती तिच्या बाळाबरोबर पालकत्वाचा आनंद घेतेय.

Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूरचा व्हिडीओ होतोय व्हायरल; करवा चौथची तयारीआणि …

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. सोनमचं सिने-करिअर भले फारसं काही चांगलं राहिलं नाही पण तिच्या फॅशन स्टाइलमुळे ती नेहमीच बातम्यांच्या हेडलाईनमध्ये राहिली. नुकतीच सोनम कपूर आई झाली आहे. त्यामुळे सध्या ती तिच्या बाळाबरोबर पालकत्वाचा आनंद घेतेय. मात्र, सोनम सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनम करवा चौथसाठी तयार होण्याबरोबरच तिचा मुलगा वायूला स्तनपान (BreastFeeding) करतेय.

सोनमचा मुलगा तिच्या मांडीवर असून ती त्याला स्तनपान करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या दरम्यान तिचा मेकअप करणारी पूर्ण टीम तिच्याबरोबर दिसतेय. तसेच, सोनमचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. तसेच, सोनम लेहेंगा आणि ज्वेलरीमध्ये खूपच सुंदर दिसतेय. हा व्हिडिओ शेअर करताना सोनम कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या टीमसोबत खऱ्या जगात परतणे, कपडे घालून लोकांना भेटणे खूप छान आहे. आपल्या होम ग्राऊंडवर परतणे खूप छान आहे. Love U Mumbai #मुंबई.” सोनमला सशक्त आई म्हणत असताना, तिचा नवरा आनंद आहुजानेही तिचे कौतुक केले आहे. याआधीही अनेक महिलांनी आपलं काम सांभाळून आपल्या मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना स्तनपान केलं आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन राजकारणी Larissa Waters यांनी देखील सभागृहात स्तनपान केले होते.

हे ही वाचा:

‘हर हर महादेव’ मध्ये बाजीप्रभूंच्या भूमिकेत दिसणार शरद केळकर, फर्स्ट लूक आला समोर…

Ram Setu Trailer: अंगावर शहारे आणणारा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version