Sonu Nigamला अश्रू झाले अनावर, कृष्ण कुमारच्या मांडीवर डोके ठेवून….

टी-सीरिजचे (T-Series) माजी अभिनेते आणि चित्रपट निर्माता कृष्ण कुमार (Krushn Kumar) तसेच दिवंगत गुलशन कुमार (Gulshan Kumar) यांचे भाऊ आणि भूषण कुमार (Bhushan Kumar) यांचे काका यांनी गुरुवारी (दि. १८ जुलै) रोजी आपली २१ वर्षाची मुलगी तिशा कुमार (Tisha Kumar) हिला कायमचे गमावले.

Sonu Nigamला अश्रू झाले अनावर, कृष्ण कुमारच्या मांडीवर डोके ठेवून….

टी-सीरिजचे (T-Series) माजी अभिनेते आणि चित्रपट निर्माता कृष्ण कुमार (Krushn Kumar) तसेच दिवंगत गुलशन कुमार (Gulshan Kumar) यांचे भाऊ आणि भूषण कुमार (Bhushan Kumar) यांचे काका यांनी गुरुवारी (दि. १८ जुलै) रोजी आपली २१ वर्षाची मुलगी तिशा कुमार (Tisha Kumar) हिला कायमचे गमावले. तिशा हिचे अनेक दिवसांपासून आजाराशी संघर्ष केल्यानंतर अखेर गुरुवारी निधन झाले. तिशाचे जर्मनीत कर्करोगावर उपचार घेत असताना निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, तिशा फक्त २१ वर्षांची होती.

मुंबईत तिशावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर तिशासाठी एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या शोकसभेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात सोनू निगम याला भावना अनावर झाल्याचे दिसून येत आहे. गायक सोनू निगम याने तिशासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेला हजेरी लावली होती. तिशाचे वडील आणि निर्माते कृष्ण कुमार यांची भेट घेताना सोनू निगमने त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून आपल्या भावना व्यक्त केलेल्या दिसून येत आहेत हे दृश्य पाहताना अनेकांची मने हेलावली होती. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका मिळालेल्या माहितीनुसार सोनू निगम आणि तिशा कुमार यांच्यात खास बॉन्डिंग होते. सोनू निगम हा तिशाच्या बालपणापासून तिला ओळखत होता. त्या दोघांमध्ये चांगले मैत्रीचे नाते होते. तिशाच्या निधनाने मात्र सोनू निगमला मोठा धक्का बसला आहे. कृष्ण कुमार हे टी सीरिजचे मालक आहेत. सोनू निगमचेही टी-सीरिजशी ३० वर्षांहून अधिक संबंध आहेत. टी-सीरिज आणि सोनू निगम यांनी मिळून अनेक गाणी तयार केली आहेत.

हे ही वाचा:

संजय राऊतांनी केला सवाल, बिहारला पूरस्थितीसाठी १८ हजार कोटी, मग महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का?

Heavy Rainfall : Central Railway ची वाहतूक खोळंबली ; नोकरदारांचे रेल्वे ट्रेक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version