थलापती विजय करतोय राजकारणात प्रवेश,पक्षाचे नाव ठरले?  

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता  थलापती विजयने  आता राजकारणात प्रवेश केल्याची घोषणा केली आहे.

थलापती विजय करतोय राजकारणात प्रवेश,पक्षाचे नाव ठरले?  

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता  थलापती विजयने  आता राजकारणात प्रवेश केल्याची घोषणा केली आहे.गेल्या काही दिवसांपासून विजय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाणा उधाण आलं होतं.अखेर विजयने शुक्रवारी २ फेब्रुवारीला आपला पक्ष देखील स्थापन केलाय. ‘तमिळगा वेत्री काझम’ असे थलापतीने त्याच्या पक्षाचे नाव ठेवले आहे. निवडणुक आयोगाकडे पक्षाची नोंदणी करण्यात आली असल्याचेही थलपती विजयने स्पष्ट केलय. ‘

तमिळगा वेत्री काझम’ हा पक्ष 2026 ची विधानसभा निवडणुक लढणार आहे. दाक्षिणात्य अभिनेते आजवर सिनेक्षेत्राबरोबरच राजकारणातही आपली छाप सोडताना दिसले आहेत. अनेक अभिनेते हिट सिनेमे केल्यानंतर राजकारणात सक्रीय झाले होते.  त्यामुळे विजयकडेही सर्वांचे लक्ष आहे. थलापती विजय रजनीकांत आणि कमल हसन  यांच्याप्रमाणेच राजकारणाच्या मार्गावर जाताना दिसतोय. यापूर्वीही दाक्षिणात्य अभिनेते राजकारणात उतरले. त्यांचा राजकारणातील इतिहास मोठा आहे.

अभिनेता विजय थलापती म्हणाला, “आमच्या पक्षाला निवडणुक आयोगाने नोंदणीकृत केले आहे. “मी विनम्रतेने सांगू इच्छितो की, पक्षाच्या सामन्य परिषदेने आणि कार्यकारी समितीने 2024 ची लोकसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, पक्षाकडून इतर कोणालाही पाठिंबा देण्यात येणार नाही.” साऊथ स्टार विजय थलापतीचा चाहता वर्ग मोठा आहे. या शिवाय सामाजिक कार्यातही विजय अग्रेसर असतो. त्यामुळे लोकांमध्ये विजय थलापतीचे काम पोहोचले आहे. त्याचा त्याला राजकारणातही मोठा फायदा होईल, असे बोलले जात आहे.

विजय थलापती याआधी स्थानिक राजकारणात आपला हातभार लावत  होता. सोशल मीडियावरही त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे थलापतीची राजकीय कारकिर्द कशी असणार? २०२६ च्या निवडणुकीत विजयचा पक्ष ती यश मिळवणार का ? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. सिनेक्षेत्रात आपल्या भूमिकांतून चाहत्यांच्या पसंतीस उतरणारा विजयला साउथमधील लोक राजकारणात किती साथ देणार? हे पाहावे लागेल. २०१८ मध्ये थुथुकडी पोलीस फायरिंगच्या प्रकरणानंतर विजयचा राजकारणातील सहभाग वाढला होता. विजय २०२६ मध्ये राजकारणात पदार्पण करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यापूर्वीच त्याने राजकारणात एन्ट्री केलीये. आता लक्ष आहे ते २०२६ च्या निवडणूकीकडे,तोपर्यंत आता विजय राजकारणात किती सक्रिय होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणारं आहे.

हे ही वाचा:

राजकारण करू पाहणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार? – Aaditya Thackeray

पुण्यातील पूना रुग्णालयात बॉम्ब, धमकीच्या फोनने सगळीकडे खळबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version