साऊथचे सुपरस्टार महेश बाबू यांचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे निधन झाले आहे. कृष्णा घट्टामनेनी हे तेलुगूचे प्रसिद्ध अभिनेते होते. सुपरस्टार कृष्णा म्हणून त्यांची ओळख होती. वयाच्या ७९ व्या वर्षी चित्रपटसृष्टीने एक दिग्गज गमावला आहे. आज (मंगळवारी) पहाटे ४ वाजता हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कृष्णा घट्टमनेंनी रुग्णालयात दाखल केले होते. कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनाबद्दल तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शोक व्यक्त केला आहे.
Very sad to hear of #Krishna garu’s passing away. Deepest condolences to the entire family incl Mahesh Babu garu. May Lord Venkateshwara give you strength in this difficult year. Om Shanti. #SuperStarKrishna #RIPKrishnaGaru #GhattamaneniKrishna @urstrulyMahesh @AndhraPradeshCM pic.twitter.com/ZwCJIQKMNw
— S. Rajiv Krishna (@RajivKrishnaS) November 15, 2022
कृष्णा घट्टमनेंनी चित्रपटसृष्टीतील २५ वर्षांच्या योगदानाचे स्मरण केले. महेश बाबूच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून चाहते भावूक झाले आहेत. सोशल मीडियावर चाहते आणि सेलेब्स ओल्या डोळ्यांनी टॉलिवूडच्या दिग्गज स्टारला श्रद्धांजली वाहतात. कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनाच्या वृत्ताने तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा :
Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिनच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
महेश बाबूच्या आईचे २ महिन्यांपूर्वी निधन झाले
महेश बाबू यांचे कुटुंब सध्या अत्यंत कठीण काळातून जात आहे. पूर्वी महेशच्या भावाने या जगाचा निरोप घेतला होता. त्याचवेळी या साऊथ सुपरस्टारच्या आईचेही २ महिन्यांपूर्वी निधन झाले. अशा परिस्थितीत वडील कृष्णा घट्टामेन्नी यांच्या निधनाने महेश बाबू आणि त्यांचे कुटुंबीय हादरले आहेत. वडीलांच्या मृत्यूनं महेश बाबू पुरता कोसळल्याचं म्हटलं जात आहे. तो आपल्या आई-वडीलांच्या खूप जवळचा होता. नेहमी सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचे फोटो तो शेअर करत असे.
मुंडे बहिण भावात रंगली जुगलबंदी, मिश्किल शैलीत दोघांचा संवाद