spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीचा ‘Bholaa Shankar’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बॉलीवूडप्रमाणेच सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचीही खूप चर्चा होत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) सध्या त्याच्या आगामी 'भोला शंकर' (Bholaa Shankar) या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

बॉलीवूडप्रमाणेच सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचीही खूप चर्चा होत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) सध्या त्याच्या आगामी ‘भोला शंकर’ (Bholaa Shankar) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच त्याचा हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातच आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ‘भोला शंकर’चा ट्रेलर रिलीज होताच तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ट्रेलर (Trailer) रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीन वाढली आहे.

‘भोला शंकर’ या सिनेमात कीर्ती सुरेश आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता चिरंजीवीचा एक्शन मोड पाहायला मिळत आहे. धमाकेदार ट्रेलरनंतर प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता आहे. हा पॅन इंडिया सिनेमा असल्याने निर्माते वेगवेगळ्या भाषांमध्ये सिनेमा रिलीज करणार आहेत. ‘भोला शंकर’ या चित्रपटात चिरंजीवीचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली असून हा सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट धमाल हिट होईल,अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर (box office) धमाका करण्यास ‘भोला शंकर’ सज्ज आहे.

दरम्यान ‘भोला शंकर’ या चित्रपटाची घोषणा ऑगस्ट २०२१ मध्ये करण्यात आली होती. हैदराबादमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. हा चित्रपट एक्शनने भरलेला असणार आहे . या सिनेमात चिरंजीवीचा डॅशिंग लुक पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील चिरंजीवीचा हटके लुक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. त्यातच आता चिरंजीवीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. मेहर रमेशने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता चिकंजीवीचा ‘भोला शंकर’ या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

हे ही वाचा:

पुन्हा एकदा Hrithik Roshan आणि Saba Azad ट्रोलिंगच्या भोवऱ्यात

मोहरमनिमित्त पुण्यातील वाहतुकीत उद्या होणार बदल

Welcome 3 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss