श्रीदेवीची ऑनस्क्रीन मुलगी आणि पाकिस्तानी लष्कराने हनी ट्रॅपसाठी वापरलेली ही बॉलिवूड अभिनेत्री आहे तरी कोण?

माझा देश नैतिकदृष्ट्या दिवसेंदिवस बिघडत चालला आहे , मुलीचे चारित्र्य हनन करण्यासारखे पाप ते करत आहेत.

श्रीदेवीची ऑनस्क्रीन मुलगी आणि पाकिस्तानी लष्कराने हनी ट्रॅपसाठी वापरलेली ही बॉलिवूड अभिनेत्री आहे तरी कोण?

पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली ‘मॉम’ चित्रपटात बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवीच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारून लोकप्रिय झाली. २०१७ मध्ये आलेल्या या चित्रपटातील सजलच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. सजल २०१७ नंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात सजलचे नाव पुढे आले आहे. पाकिस्तानच्या एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने दावा केला आहे की, सजलसह अनेक पाकिस्तानी अभिनेत्रींचा पाकिस्तानी लष्कर हनी ट्रॅपसाठी वापर करत आहे. अशा गंभीर आरोपाबाबत दु:ख व्यक्त करताना सजलने म्हटले आहे की, माझा देश नैतिकदृष्ट्या दिवसेंदिवस बिघडत चालला आहे , मुलीचे चारित्र्य हनन करण्यासारखे पाप ते करत आहेत.

पाकिस्तानचे निवृत्त लष्करी अधिकारी मेजर आदिल राजा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनल आणि व्लॉगवर एक खळबळजनक खुलासा केला आहे की, पाकिस्तानी अभिनेत्रींचा पाकिस्तानातील शक्तिशाली लोक हनी ट्रॅपमध्ये वापर करत आहेत. त्याने कोणत्याही अभिनेत्रीचे नाव घेतले नसले तरी, समा टीव्हीच्या रिपोर्टनुसार, सजल अली देखील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

सजल अलीने दिले प्रत्युत्तर

अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यामुळे अभिनेत्रींना ट्रोल केले जात आहे. लोक अभिनेत्रीला वाईट बोलता आहेत. यामुळे संतापलेल्या सजल अलीने ट्विटर हँडलवर अशा गोष्टींना बकवास म्हणत सडेतोड उत्तर दिले आहे. ‘हनी ट्रॅप’च्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी अभिनेत्री सजल अलीने ट्विट केले आहे की, ‘आपला देश नैतिकदृष्ट्या अत्यंत वाईट होत चालला आहे, एखाद्याचे चारित्र्य हनन करणे हा मानवतेचा आणि पापाचा सर्वात घृणास्पद प्रकार आहे’, असे ट्विट तिने केले आहे.

सजल अली हे पाकिस्तानी मनोरंजन उद्योगातील एक प्रसिद्ध नाव आहे. अनेक पाकिस्तानी मालिकांमुळे तिला भारतातही ओळखले जाते. सजलने ‘मॉम’ या बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. हा व्हिडिओ व्हायरल करणारे पाकिस्तानी माजी लष्करी अधिकारी मेजर आदिल रझा ‘सोल्जर स्पीक्स’ नावाचे यूट्यूब चॅनल चालवतात, ज्याचे २ लाख ९० हजार सबस्क्राइबर्स आहेत. आदिल हे सक्रिय राजकीय भाष्यकार आणि इम्रान खानचे समर्थक देखील आहेत.

हे ही वाचा:

उर्फीच्या वादात उडी घेतलेल्या सुषमा अंधारेंवर अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांनी सोडले बाण

नार्को टेस्टच्या मुद्यावर ठाकरे गट आक्रमक, नारायण राणेंवर गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version