spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

स्ट्रिमिंग कंपनी नेटफ्लिक्सला फटका; ग्राहकांचं होणार नुकसान…

जगातील प्रसिद्ध स्ट्रिमिंग कंपनी Netflix सध्या संकटात असल्याची चर्चा सुरू आहे. लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सच्या सब्सक्राइबर्सची (Low subcribers) संख्या कमी होत आहे. अनेक युजर्स आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड इतरांसोबत शेअर करत असल्याने नेटफ्लिक्सला फटका बसत आहे. आता अशा दिलदार युजर्सवर कंपनी कारवााई करणार आहे.

जगातील प्रसिद्ध स्ट्रिमिंग कंपनी Netflix सध्या संकटात असल्याची चर्चा सुरू आहे. लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सच्या सब्सक्राइबर्सची (Low subcribers) संख्या कमी होत आहे. अनेक युजर्स आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड इतरांसोबत शेअर करत असल्याने नेटफ्लिक्सला फटका बसत आहे. आता अशा दिलदार युजर्सवर कंपनी कारवााई करणार आहे. अमेरिकेत नेटफ्लिक्सने अशा युजर्सकडून दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पासवर्ड शेअरिंग करण्याचे प्रकार कमी होईल असा अंदाज आहे. सध्या 10 कोटीपेक्षा जास्त लोकांकडून Netflix चं अकाउंट तर वापरलं जातं पण त्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क देत नाहीत. असं नेटफ्लिक्सचं म्हणणं आहे.

यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत नेटफ्लिक्सच्या ग्राहकांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे कंपनीने गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास अपयशी ठरली आहे. कंपनीचं 2.41 मिलियन ग्राहक जोडण्याचं अपेक्षित लक्ष होतं. पण प्रत्यक्षात १. ७५ मिलियन ग्राहक जोडता आले आहेत. यासाठी पासवर्ड शेअरिंग करणारे ग्राहक कारणीभूत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. परंतु, हा कोसळलेला डोलारा सांभाळाण्यासाठी नेटफ्लिक्सने कंबर कसली आहे. ग्राहक वाढवण्यासाठी कंपनीने दोन नवीन योजना आखल्या आहेत. यामध्ये पहिली पासवर्ड शेअरिंग योजना आणि दुसरी जाहिरातींसह मेंबरशिप योजना आहे.जवळपास १० कोटी युजर्स असे आहेत, जे नेटफ्लिक्स मोफत वापरतात. त्यासाठी ते कोणत्याही प्रकारचे शुल्क देत नाहीत, असे नेटफ्लिक्सचे म्हणणे आहे. पेड शेअरिंग नवीन ग्राहकांना जोडण्याचा एक संभाव्य स्त्रोत बनवलं जाऊ शकतं. कंपनीने २०२३ च्या पहिल्या तिमाहीत अमेरिकेमध्ये पासवर्ड शेअरिंग करणाऱ्यांवर ग्राहकांवर दंड वसूल करण्याची योजना आखत आहे. येत्या काळात लवकरच तशी पाऊल उचलली जाणार असल्याचं नेटफ्लिक्सने सांगितले आहे.

गेल्यावर्षी कंपनीचे जवळपास १० लाख ग्राहक कमी झाले होते. यानंतर कंपनीने अमेरिका आणि कॅनडामधून फक्त १ लाख ग्राहकांना जोडलं. तरीही अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय टीव्ही नेटवर्क आहे. सध्या कंपनीसाठी आशियाई देश नवीन ग्राहकांचा सर्वात मोठा स्त्रोत असून याकडे Netflixने जास्त लक्ष केंद्रीत करत आहे. तसेच सब्सक्रिप्शनच्या किंमतीवरही विचारविनिमय केला जात असल्याचं नेटफ्लिक्सने सांगितले आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सच्या ग्राहकांना नवीन किंमती संदर्भात लवकरच माहिती मिळणार आहे.

हे ही वाचा : 

Aaradhya Bachchan संदर्भात खोटी बातमी, बच्चन कुटुंबीय पोहोचले हायकोर्टत

Mumbai Police यांचे संपूर्ण शहरात ‘ऑल आऊट ऑपरेशन’

PBKS vs RCB यांच्यातील आजची लढत कोण जिंकणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss