Tuesday, July 2, 2024

Latest Posts

‘तू भेटशी नव्याने’ मालिकेत सुबोध आणि शिवानीचा अनोखा अंदाज

अभिनेता सुबोध भावे हा अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे. त्याने आजवर साकारलेल्या भूमिकांचं नेहमी प्रेक्षकांकडून कौतुक झाले आहे. एखादी व्यक्तिरेखा अविस्मरणीय कशी करावी? याचे उत्तम उदाहरण सुबोध भावे वेळोवेळी दाखवून देत असतो. सुबोध भावे आता छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा कमबॅक करत आहे.

अभिनेता सुबोध भावे हा अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे. त्याने आजवर साकारलेल्या भूमिकांचं नेहमी प्रेक्षकांकडून कौतुक झाले आहे. एखादी व्यक्तिरेखा अविस्मरणीय कशी करावी? याचे उत्तम उदाहरण सुबोध भावे वेळोवेळी दाखवून देत असतो. सुबोध भावे आता छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. आता तो पुन्हा नव्या लुकमुळे चर्चेत आहेत ‘तू भेटशी नव्याने’ या शीर्षकाप्रमाणेच एका नव्या रूपात आपल्याला सुबोध भावे (Subodh Bhave) आणि शिवानी सोनार (Shivani Sonar) ही जोडी दिसणार आहे. ही मालिका येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रात्री ९.०० वाजता आपल्या भेटीला येणार आहे. ‘तू भेटशी नव्याने’ या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेच्या माध्यमातून ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.

९० चे दशक म्हणजे मंतरलेला काळ होता. हे दशक फॅशन, सौंदर्य, टेलिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण संक्रमणाचा कालखंड होता. अनेक क्षेत्रांत आमूलाग्र बदल होत होते. आजही त्या आठवणी अनेकांसाठी ताज्या आहेत.  या काळातील बरेच ट्रेंड सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय झाले. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सेट केलेल्या ट्रेंडला या काळात चांगली लोकप्रियता मिळाली. सोनी मराठी वाहिनीने या ट्रेंडचा अभ्यास करत त्या काळातील फॅशन ट्रेंड ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतून पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला आहे. नव्वदीच्या दशकातील हा काळ आता सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.

सुबोध आणि शिवानी यांच्या खास लूकची पहिली झलक समोर आल्यावर चाहत्यांना त्यांचा अनोखा अंदाज चांगलाच भावल्याचे दिसून येत आहे. नव्वदीच्या दशकातील त्यांचा हटके लूक चर्चेचा विषय ठरलाय. ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या निमित्ताने प्रथमच दोन वेगळ्या काळातल्या भूमिका आणि नव्वदीच्या काळातील नॉस्टेल्जीया अनुभवायला मजा येणार असल्याचे हे दोघे सांगतात. या मालिकेत पहिल्यांदाच AI चा वापर केला आहे. AI चा वापर करून ह्या मालिकेतील व्यक्तिरेखा साकारली जाणार असल्याने ‘तू भेटशी नव्याने’ ह्या मालिकेच्या प्रोमोनंतर या मालिकेविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर (Ajay Mayekar) आहेत. येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रात्री ९.०० वाजता सुरु होणारी ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका पाहणे रंजक ठरणार आहे.

हे ही वाचा

Sai Tamhankar Birthday Special: खडतर प्रवास ते मुंबईतील आलिशान घराची मालकीण, ‘अशी’ आहे सईच्या आयुष्याची गोष्ट

Chandrakant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Rohit Pawar आणि Amol Mitakari संतापून म्हणाले, दादा तुम्ही….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss