spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सुबोध भावे दिसाणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत; केली नव्या चित्रपटाची घोषणा

सुबोध भावे 'हर हर महादेव' या चित्रपटात 'छत्रपती शिवाजी महाराज' यांची भूमिका साकारणार आहे.

सुबोध भावे मराठी सिनेसृष्टीतील एक प्रयोगशील अभिनेता. सुबोध भावे आतापर्यंत अनेक मराठी मालिका, सिनेमा आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. प्रत्येक सिनेमात, मालिकेत तो दरवेळी एखाद नव्या ढंगाचं पात्र घेऊन प्रेक्षकांच्या समोर येत असतो आणि प्रेक्षकही त्याच्या या अभिनयाला उत्तम दाद देत असतात. त्याने मराठीमध्ये चरित्रपट साकारण्याची परंपरा रुजवली. बालगंधर्व, लोकमान्य टिळक तसेच काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिका लीलया पेलल्या.

आता पुन्हा एक ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी सुबोध भावे सज्ज झाला आहे. तो लवकरच एका महत्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.काल सुबोध भावेने सोशल मीडियावर ‘उद्या सकाळी महत्वाची घोषणा करणार आहे’ अशी पोस्ट टाकली होती. त्यामुळे सुबोध भावे नेमकी कोणती घोषणा करणार आहे याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये लागून राहिली होती आणि अखेर त्याने ती घोषणा केली आहे, सुबोध भावे नवीन ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारणार असल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. सुबोध भावे ‘हर हर महादेव’ या चित्रपटात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांची भूमिका साकारणार आहे.

त्याने पोस्ट शेअर करताना म्हटलंय कि, ”छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं की आठवतं त्यांचं रूप, त्यांचा प्रताप आणि मनात डोकावून जातात त्यांच्या असाधारण शौर्यकथा…तो दरारा, तो रूबाब, त्यांची अखंड हिंदवी स्वराज्याची संकल्पना आणि ती सत्यात उतरवताना केलेल्या लढाया…झी स्टुडिओज् अभिमानाने सादर करीत आहे, शिवरायांच्या भूमिकेत अष्टपैलू अभिनेता येत्या दिवाळीत संपूर्ण भारतात घुमणार स्वराज्याचा महामंत्र, आपल्या शिवरायांची शिवगर्जना ‘हर हर महादेव’ ते ही पाच भाषांमध्ये.”

सुबोध भावेंच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तो सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. येत्या काळात झी मराठीवर त्याचा ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. तसेच ‘मारवा’ या एका नवीन चित्रपटाचं दिग्दर्शन सुबोध करत आहे. त्याचबरोबर सुबोध भावेची निर्मिती संस्था लवकरच ‘कालसूत्र – प्रथम द्वार | मृत्यूदाता’ ही नवीन वेब सिरीज घेऊन येणार आहे.

हे ही वाचा:

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे मायदेशी परतले, सरकारकडून विशेष सुरक्षा, बंगला

पुढचे काही दिवस पुणे तापणार; उष्णतावाढीबद्दल हवामान विभागाने केला अंदाज व्यक्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss