Sunday, June 30, 2024

Latest Posts

Munjya च्या यशानंतर पुन्हा Horror चित्रपटाची जादू, Riteish Deshmukh दिसणार मुख्य भूमिकेत

प्रेक्षकांकडून 'मुंज्या' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाला प्रतिसाद मिळत असताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार (Aaditya Sarpotdar) चा दुसरा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'ककुडा' (Kakuda) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रेक्षकांकडून ‘मुंज्या’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाला प्रतिसाद मिळत असताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) चा दुसरा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘ककुडा’ (Kakuda) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) यांची या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहे. रितेश आणि आदित्य दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी दोघांनी ‘माउली’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. ‘माउली’ ह्या चित्रपटात रितेश मुख्य भूमिकेत होता. यापूर्वी रितेशने अनेक चित्रपटात विनोदी भूमिका साकारलेल्या असून तो पहिल्यांदाच हॉरर-कॉमेडी चित्रपटात भूमिका साकारणार आहे. यामुळे, सर्व चाहत्यांची उत्सुकता अजूनच वाढलेली दिसत आहे.

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली आहे. ‘मुंज्या’ च्या  भरघोस यशानंतर आणि प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार दुसरा हॉरर-कॉमेडी चित्रपट घेऊन येत आहे. ‘ककुडा’ या चित्रपटाची घोषणा करताना त्याची झलकही दाखवण्यात आली आहे. ऍनिमेशन असलेल्या या पहिल्या झलकमध्ये घडयाळात ७.१५ वाजलेले दाखवण्यात आले आहे. ७.१५ च्या सुमारास एक सावली दिसते. त्यानंतर घराचा दरवाजा ठोठावण्यात येतो आणि कोणाचे तरी पाय लटकलेले दिसतात. या चित्रपटाचा पहिला लूक झी ५ (Zee 5) च्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून व्हिडिओला कॅप्शन देण्यात आली आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, मंगळवार, सायंकाळी ७. १५ वाजता दरवाजा उघडण्यास विसरू नका … कारण सर्व पुरुष धोक्यात आहेत. अद्याप चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर झाली नाहीये. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित न होता OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

या चित्रपटाची कथा ही उत्तर प्रदेशातील एका गावाची असून ते गाव अनेक वर्षांपासून शापित आहे. या गावात दर मंगळवारी, संध्याकाळी ७.१५ वाजता छोटा दरवाजा उघडला जातो आणि घरातील मुख्य दरवाजा उघडत नाही. त्याला शिक्षा दिली जाते. हे गाव या शापापासून मुक्त होईल का? हे सर्व रहस्य आपल्याला ‘ककुडा’ चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.

 

हे ही वाचा

Thane शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी CM Shinde यांचे कारवाईचे निर्देश

Litchi Fruit Benefits: लिची तुम्हाला आवडते का? फायदे वाचून व्हाल थक्क…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

 

 

 

 

Latest Posts

Don't Miss