दक्षिण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का, प्रसिद्ध कला दिग्दर्शक सुनील बाबू यांचे आकस्मिक मृत्यू

दक्षिण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का, प्रसिद्ध कला दिग्दर्शक सुनील बाबू यांचे आकस्मिक मृत्यू

दाक्षिणात्य सिनेसृष्टीला एक मोठा धक्का बसला आहे. दक्षिण भारतीय चित्रपट सिनेसृष्टीतील चित्रपटांचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक सुनील बाबू (Suneel Babu) यांचे वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी निधन झाले आहे. सुनील बाबू यांनी बंगलोर डेज (Bangalore Days), गजनी (Ghajini), सीता राममसह (Sita Ramam) अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले होते. सुनील बाबू (Suneel Babu) हे सध्या ‘वारीसू’ याआगामी चित्रपटासाठी चर्चेत होते. पण सुनील बाबूंच्या आकस्मिक निधनाने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आणि अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आणि सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कला दिग्दर्शक सुनील बाबू (Suneel Babu) यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. तर काही दिवसांपूर्वीच सुनील बाबू यांच्या (Suneel Babu) पायाला दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सुनील बाबू (Suneel Babu) यांनी कला दिग्दर्शक साबू सिरिल यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल होत. त्यानंतर त्यांनी मल्याळम, तेलगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर म्हणूनही काम केले आहे. सुनील बाबू यांनी बराच काळ कला दिग्दर्शक साबू सिरिल यांचे सहाय्यक म्हणून काम केलं. सुनील बाबू यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. सुनील बाबू यांनी दक्षिण भारतीय चित्रपट आणि ‘सिंग इज किंग’ (Singh Is Kinng), ‘एमएस धोनी’ (MS Dhoni), ‘पा’ (Paa), ‘लक्ष्य’ (Lakshya), ‘स्पेशल २६’ (Special 26) सारख्या अनेक मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये आपले काम दाखवले आहे. या व्यतिरिक्त सुनील बाबू यांनी ‘रोज’ या हॉलिवूड चित्रपटाही कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

सीता रामम चित्रपटाचे दिग्दर्शक हनु राघवपुडी यांनी ट्विट केले, “हे खरोखर हृदयद्रावक आणि पचायला कठीण आहे! तो आता आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही. हे पुन्हा दाखवते की जीवन कसे अयोग्य आणि अप्रत्याशित असू शकते. सुनील बाबू जगाला तुमची आठवण येईल.” असे हनु राघवपुडी यांनी त्यांच्या ट्विट मध्ये लिहिले आहे. अशा प्रकारे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सुनील बाबू याना श्रद्धांजली वाहिली आहे.

हे ही वाचा:

Taylor Swift’s Cat’s Networth टेलर स्विफ्टची मांजर आहे जगातील सर्वात महाग मांजर

कंत्राटी कामगारांची पिळवणूक कमी करण्यासाठी इम्तियाज जलील यांचं आंदोलन, एक कोटी कोणाच्या खिशात? याची विचारणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version