spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sukh Mhanje Nakki Kay Asta : गौरी – जयदीपच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण

आपल्या भारतीय संस्कृतेत नवरात्री या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक जण या सणात कसं सहभागी होता येईल यासाठी प्रयत्न करत असतो.

Sukh Mhanje Nakki Kay Asta : आपल्या भारतीय संस्कृतेत नवरात्री या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक जण या सणात कसं सहभागी होता येईल यासाठी प्रयत्न करत असतो. त्यात टीव्हीवरील मालिका कशा मागे राहतील. स्टार प्रवाह वरील सर्वांची लाडकी मालिका ‘ सुख म्हणजे नक्की काय असत’ हि सध्या एक वेगळ्या टप्प्यावर आली आहे. नुकतंच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ (Sukh Mhanje Nakki Kay Asata) ची टीम कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला जाऊन आली आहे. मालिकेतील एका महत्वाचा भाग शूट करण्यासाठी संपूर्ण टीम तिथे गेली होती. आणि याच मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या आयुष्यात लवकरच सुखाचे क्षण येताना दिसत आहेत.

 मालिका एका महत्वाच्या वळणावर आली आहे. गौरी आणि जयदीप (Gauri Jaydeep) आई-बाबा होणार आहेत. त्यातच गौरीचा अपघात झाला आहे. गौरी आणि बाळाच्या जीवाला धोका आहे. ते दोघे मृत्यूशी झुंज देत आहेत. गौरीचे आणि बाळाचे प्राण वाचवण्यासाठी जयदीप कोल्हापूरला अंबाबाईला (Ambabai) साकडं घालण्यासाठी गेला आहे.जयदीप मंदिरामध्ये साफसफाई करताना, दिवे लावताना दिसत आहे. तसेच जयदीप मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या चपला सांभाळताना देखील दिसत आहे. हा भाग आपल्याला नवरात्री दरम्यान पाहता आला आहे. मात्र पुढे आता एक अनोखे रूप हि मालिका घेणार आहे. गौरीला वाचवण्यासाठी घरातील अनेक लोक देवीसमोर प्रार्थना करत असताना दाखवले आहेत त्यातच जयदीप देवीची सेवा करतो तर दादासाहेब शिर्केपाटिल म्हणजेच गौरीचे वडील देवीचा गोंधळ घालतात. सर्वांचे सर्व पर्यंत होतात आणि अखेर दसऱ्याच्या दिवशी हि मालिका सर्व प्रेक्षकांना खुशखबर देणार आहे. याचा एक छोटा प्रोमो देखील आता शेअर करण्यात आला आहे. त्या प्रोमोमध्ये जयदीप आणि गौरीला एक गोंडस मुलगी झाल्याचे दिसत आहे.

जयदीप हे पात्र साकारणारा अभिनेता मंदारने देखील या विशेष भागासाठी खूप मेहनत केली आहे. मंदारने यापूर्वी देखील कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले आहे. परंतु त्याची इच्छा होती की मालिकेचा एकतरी भाग या पवित्र जागी चित्रित व्हावा. मंदारने सांगितले की, “देवी अंबाबाईच्या आशीर्वादाने माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. शूटिंगच्या निमित्ताने मला इथे काम करण्याची संधी मिळाली हे क्षण मी कधीच विसरू शकत नाही. या विशेष भागचे शूटिंग पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती. प्रेक्षकांचे हे प्रेम मला नवी ऊर्जा देतं.”

हे ही वाचा:

जाणून घ्या, सुझलॉन, आरआयएल, ओएनजीसी, गॅस, एअरटेल, एचएफसीएल, अदानी एंटरप्राइजेस यांच्या स्टॉक्सबाबत

Alia Bhatt: ‘भर पुरस्कार सोहळ्यात भाषण सुरु असताना बाळानं पोटात मारली लाथ’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss