प्रजासत्ताक दिनी सनी देओलच्या ‘Gadar 2’ चा फर्स्ट लूक समोर आला, जाणून घ्या चित्रपटाची रिलीज डेट?

२०२३ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, सनी देओलचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'गदर २' चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

प्रजासत्ताक दिनी सनी देओलच्या ‘Gadar 2’ चा फर्स्ट लूक समोर आला, जाणून घ्या चित्रपटाची रिलीज डेट?

हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार कलाकारांबद्दल बोलायचे झाल्यास, सनी देओलचे नाव आवर्जून घेतले जाते. २०२३ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, सनी देओलचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गदर २’ चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यासोबतच दिग्दर्शक अनिल शर्मांच्या ‘गदर २’ ची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

‘गदर २’ चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आज २६ जानेवारी रोजी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘गदर २’ च्या फर्स्ट लूक पोस्टरची माहिती दिली आहे. तरण यांच्या या इन्स्टा पोस्टमध्ये सुपरस्टार सनी देओल स्टारर चित्रपट ‘गदर २’ चे फर्स्ट लूक पोस्टर सहजपणे पाहता येत आहे सनी देओल हातात हातोडा घेऊन सरदार तारा सिंगच्या लूकमध्ये खूप खंबीर आणि मजबूत दिसत आहे. यासोबतच ‘गदर २’च्या फर्स्ट लूक पोस्टरवर हिंदुस्तान झिंदाबाद लिहिलेले आहे, जे सनी देओल पुन्हा लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागी करण्यासाठी येत आहे हे सांगण्यासाठी पुरेसे आहे. एकूणच ‘गदर २’चे फर्स्ट लूक पोस्टर खूपच प्रभावी आहे. या पोस्टरमुळे ‘गदर २’साठी चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित झाली आहे.

 ‘गदर २’ कधी रिलीज होणार?

तरण आदर्श यांनी ‘गदर २’ चे फर्स्ट लूक पोस्टर शेअर करण्यासोबतच या चित्रपटाच्या रिलीज डेटचीही माहिती दिली आहे. ‘गदर २’च्या फर्स्ट लूक पोस्टरवर सनी देओलच्या चित्रपटाची रिलीज डेट स्पष्टपणे दिसत आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर ११ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘गदर २’ या चित्रपटात सनी देओलशिवाय बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २००१ मध्ये गदर-एक प्रेम कथा भाग एक रिलीज झाला होता. ज्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शवली होती.

हे ही वाचा:

लवकरच राजकीय आरोग्याच्या काळजीसाठी ठाण्यात येणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

उद्धव ठाकरे आनंद आश्रमात जाणार का ? राजकीय वातावरण तापलं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version