सुपरस्टार रजनीकांतचे ‘जेलर’च्या फर्स्ट पोस्टरवर गंभीर लुक

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे.

सुपरस्टार रजनीकांतचे ‘जेलर’च्या फर्स्ट पोस्टरवर गंभीर लुक

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘जेलर’ (Jailer) असे या सिनेमाचं नाव आहे. नेल्सन मंडेलाने (Nelson Mandela) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाचे शूटिंग सुरू झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. अशातच आज या सिनेमाचे फर्स्ट पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

‘जेलर’ सिनेमात प्रेक्षकांना अँक्शनचा तडका अनुभवायला मिळणार आहे. नेल्सन मंडेला दिग्दर्शित हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप निर्मात्यांनी रिलीज डेट संदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. ‘जेलर’ सिनेमाच्या नव्या पोस्टरमधील रजनीकांतचा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सन पिक्टर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘जेलर’चे पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये रजनीकांतचा फॉर्मल लूक असून तो खूपच गंभीर दिसून येत आहे. नव-नवीन भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या रजनीकांतचा नवा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

‘जेलर’ सिनेमाचे शूटिंग हैदराबादमध्ये होत आहे. पोस्टर शेअर करत सन पिक्चर्सने लिहिलं आहे, ‘जेलर’ च्या अँक्शनला सुरुवात झाली आहे. सुपरस्टार रजनीकांतचा ‘जेलर’ हा १६९ वा सिनेमा आहे. या सिनेमात रजनीकांतसह शिवराज कुमारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तसेच या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता बाबूदेखील दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

हे ही वाचा :-

कपिल शर्मा शो पुन्हा परतणार परंतु हा चेहरा असणार शोमधून गायब

‘गॉडफादर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version