spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून राज कुंद्राविरोधात पुरवणी आरोपपत्र महानगर दंडाधिकारी कोर्टात दाखल

राज कुंद्रा यांच्यावर पॉर्नोग्राफी प्रकरणावरून २०२१ पासून कोर्टात खटला सुरु आहे. तर मुंबई पोलिसांनी नुकताच आणखीन एक पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे.राज कुंद्रा आणि त्याच्या साथीदाराला पॉर्नोग्राफी प्रकरणात जुलै २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. पण नंतर सप्टेंबर २०२१ मध्ये .राज कुंद्राचा जमीन मंजूर करण्यात आला होता. पण आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखीन काही पुरावे गोळा करत पुन्हा एकदा मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात पुरवणी आरोपपत्र सादर केलं.

गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये मुंबई पोलिसांनी मालाडमधील मालवणी इथल्या एका बंगल्यावर छापा टाकला होता. या बंगल्यात अश्लील चित्रपट चित्रीत केले जात असून त्यासाठी मुलींवर दबाव टाकला जात होता, असा आरोप करण्यात आला होता. त्या बंगल्यातून पाच जणांना अटक करण्यात आली होती. आणि त्यानंतर ९ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी पहिल्यांदा एप्रिल २०२१ मध्ये आरोपपत्र दाखल केलं होतं आणि त्यानंतर जुलै महिन्यात राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार थॉर्प यांना अटक केली. त्यानंतर पुरवणी आरोपपत्रात कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षी आणि यश ठाकूर यांना वॉण्टेड जाहीर करण्यात आलं.

हा खटला मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टात सुरु होता, कोर्टाने आरोपींवर जी कलमं लावण्यात आलीत त्यात सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद नाही. असा युक्तिवाद राज कुंद्रा याच्या वकिलाने केला असता या युक्तिवादाला ग्राह्य धरत कोर्टाने राज कुंद्रासह त्याचा सहकारी आणि आयटी प्रमुख रायन थॉर्प यांना सप्टेंबर २०२१ मध्ये जामीन मंजूर केला होता.

त्यानंतर मुंबई पोलिसांनी राजकुंद्राच्या विरोधात अजून सबळ पुरावे गोलाकारण्यास सुरुवात केली. या प्रकरणात राज कुंद्राचा नातलग प्रदीप बक्षी आणि यश ठाकूर यांच्या देखील सहभाग असल्याचं पोलिसांना अढळल या सर्वांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी सुमारे दिड हजार पानांचं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या सर्वांवर पिडीत मुलींचा लैंगिक छळ करणे, त्यांची फसवणूक करणे, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार पोलिसांनी गंभीर आरोप लावले आहेत.या पुरवणी आरोपपत्रात मुंबई पिलीसानी कुंद्राच्या लॅपटॉपमध्ये सापडलेल्या ६० हुन अधिक अश्लील व्हिडीओ क्लिप जोडलेल्या आहेत.

Viral Video : नाव ‘दत्ता’ अधिकाऱ्यांने रेशन कार्डवर लिहलं ‘कुत्ता’ ; पीडित तरुणाने कुत्रा बनून अधिकाऱ्याला शिकवला धडा

Latest Posts

Don't Miss