Kanguva Release Date साऊथ सुपरस्टार रजनीकांतसाठी सूर्याने चित्रपट पुढे ढकलला सुर्याचा कंगुवा रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर

Kanguva Release Date साऊथ सुपरस्टार रजनीकांतसाठी सूर्याने चित्रपट पुढे ढकलला सुर्याचा कंगुवा रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर

कंगुवा चित्रपटामध्ये अभिनेता सूर्यासोबत बॉबी देओल ही महत्वाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. सुपरस्टार अभिनेता सूर्या, आणि बॉबी देओल आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या बहुप्रतीक्षित कंगुवा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा लेखक-दिग्दर्शक शिव यांचा कंगुवा चित्रपट, मात्र आता हा फॅंटसी आणि ॲक्शन चित्रपट आता १४ नोव्हेंबरला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. कंगुवा चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट पुढे का ढकली ह्याची माहिती दिली आहे.

‘कंगुवा’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली

कंगुवा चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्याची उत्सुकता वाढली आहे. कंगुवा चित्रपटाचं (Kanguva Movie) पोस्टर रिलीज झाल्यापासून चाहत्यांच याकडे लक्ष वेधल आहे. मोवीचा ट्रेलर पाहिल्यानंतर नंतर चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलरमध्ये जे दृश्य दाखवण्यात आलेले ,कलाकाराचा वास्तवादी अभिनय आणि मंत्रमुग्ध करणारे संगीत यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. कंगुवा चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट हिट होणार असल्याचं बोललं जात आहे. दिग्दर्शित कंगुवा हा या वर्षांमधील सर्वात मोठा आणि महागडा चित्रपट मानला जात आहे. कंगुवा ज्यांची सुरवातीला १० ऑक्टोबर २०२४ रोजी पडद्यावरती येण्याची योजना होती,तो रजनीकांतच्या टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित ‘वेट्टयान’ १० ऑक्टोबरला घोषित झाल्यानंतर नोव्हेंबर २०२४ ला ढकलण्यात आला आहे. चित्रपटाचे निर्माते स्टुडिओ ग्रीनने एक्स मीडियावर नवीन चित्रपटाच्या रिलीज डेट ची घोषणा करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये “द बॅटल ऑफ प्राइड अँड ग्लोरी,फार द वर्ल्ड टू विटनेस असं स्टुडिओ ग्रीनने लिहलंय. १४ नोव्हेंबरपासून कंगुवा चित्रपगृहामध्ये आहे. कंगुवा आणि वेट्टयान चित्रपटाची टक्कर टाळण्यासाठी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.

चित्रपटामध्ये सूर्यासोबत बॉबी देओल आणि दिशा पटनी महत्वाच्या भूमिकेत सुमारे ३५० कोटीहून अधिक असणारे कंगुवा चित्रपटाचे बजेट आहे. हा चित्रपट ह्यावर्षीतील सर्वात महागडा चित्रपट असल्याच सांगत आहे. कंगुवा चित्रपटाचे बजेट हे पुष्पा,सिघम आणि इतर मोठ्या बजेट असणाऱ्या प्रोजेक्टपेक्षा जास्त आहे. कंगुवा हा चित्रपट सात वेगवेगळ्या देशामध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये विशेषतःह सिनेमॅटोग्राफी आणि ॲक्शनसाठी हॉलिवूड तज्ज्ञांचा देखील सहभाग आहे.

हे ही वाचा:

PM Narendra Modi यांच्या हस्ते अमरावती टेक्सटाईल पार्कचं ई-भूमिपूजन; Navneet Rana यांना अश्रू अनावर

काँग्रेसला गणपती पूजेची चीड, त्यांनी माझ्या पूजेलाही विरोध केला: PM Narendra Modi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version