spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sushant Singh Rajputच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ आला समोर, ‘क्या हाल कर दीया’ म्हणत रिया चक्रवर्तीवर भडकले चाहते

आता सुशांतचा एक थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला अडीच वर्षे उलटून गेली आहेत, पण त्याच्या मृत्यूचे गूढ अद्याप उकललेले नाही. दरम्यान, सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीएक मोठा खुलासा केला असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुशांतच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा असल्याचा दावा कर्मचाऱ्याने केला आहे. अशा परिस्थितीत ही आत्महत्या आहे असे वाटत नाही. आता सुशांतचा एक थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

सुशांतची अशी अवस्था दिसतेय व्हिडिओत

सुशांत सिंग राजपूतची तब्येत ठीक नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. त्याला नीट बोलताही येत नाहीये. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा सुशांत आणि रिया चक्रवर्ती एकत्र राहत होते. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते सुशांतच्या या स्थितीसाठी रियाला जबाबदार धरत आहेत.

रिया चक्रवर्तीवर भडकले चाहते

सुशांत सिंग राजपूतच्या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘क्या हाल कर दिया था सुशांत सिंग राजपूत का’. दुसर्‍याने लिहिले, ‘नर्क भी नसीब नहीं होगा रिया को ऐसे टैलेंटेड लड़के को मारकर’. तिसऱ्या यूजरने ‘मार दिया ड्रग्स दे देकर’ अशी कमेंट केली. त्याचबरोबर अनेक यूजर्सनी रिया चक्रवर्तीला तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे.

सुशांतची हत्या की आत्महत्या?

रूपकुमार शाह हे सुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमॉर्टम टीमचे सदस्य आहेत. नुकतेच एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ‘अडीच वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आला होता. मृतदेह पाहून मी वरिष्ठांकडे गेलो आणि सांगितले की, ही आत्महत्या असल्यासारखे दिसत नाहीये. सुशांतच्या मानेवरची खूण फासावर लटकलेली दिसत नव्हती. हा प्रकार वरिष्ठांना सांगितला असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व नंतर चर्चा करू असे सांगितले, असेही शहा यांचे म्हणणे आहे. रूपकुमार शाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते म्हणत आहेत, ‘जेव्हा सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तेव्हा आम्हाला कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी 5 मृतदेह मिळाले होते. त्यापैकी एक व्हीआयपी बॉडी होती. आम्ही पोस्टमॉर्टम करायला गेलो तेव्हा कळलं की हा मृतदेह सुशांतचाच आहे. त्याच्या शरीरावर अनेक खुणा होत्या. मानेवर दोन-तीन खुणाही होत्या.

हे ही वाचा:

Anant Ambani Radhika Merchant Engagement मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंतने राधिका मर्चंटशी केला साखरपुडा, पहिला फोटो आला समोर

बॉलिवूडवर पसरली शोककळा; ‘रेडी’ चित्रपटाचे निर्माते नितिन मनमोहन यांचं निधन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss