spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सुष्मिता सेन ने ललित मोदी प्रकरणावर सोडले मौन

मुंबई : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतच्या नात्याचा खुलासा केला. तेव्हापासून साऱ्यांचे लक्ष सुष्मिता सेन वर आहे. ललित मोदींसोबतच्या साखरपुड्याच्या आणि लग्नाच्या बातमीवर सुष्मिता सेन कधी मौन सोडणार याचीच सर्वांना प्रतीक्षा होती. सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्रामवर आकाउंट एक पोस्ट केली आहे. पोस्ट मध्ये सुष्मिता सेन ललित मोदीसोबत नसून. तिच्या दोन मुलींसोबत असल्याचं दिसून येतंय. हा फोटो शेअर करून त्यासोबत तिने भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा :

‘माझ्या आयुष्यातला ‘तमाशा Live’ म्हणत हेमांगी कवीने केली पोस्ट शेअर

 

या फोटोसह सुष्मिता सेनने ललित मोदीसोबतच्या तिच्या नात्यावर तिने मौन सोडले आहे. तिने या पोस्ट मध्ये असे लिहले आहे कि, मी खूप आनंदी आहे. जिथे फक्त आनंदी आनंद आहे. मी लग्न केलं नाहीए, नाही साखरपुडा केला आहे. माझ्या सोभवताली फक्त प्रेमच प्रेम आहे. मी सगळ्या प्रकारच क्लॅरिफिकेशन तुम्हाला दिल आहे. आता मी माझ्या आयुष्यावर आणि कामावर फोकस करतेए. तुम्ही माझा आनंद शेअर केलात त्याबद्दल धन्यवाद. मी तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम करते. अशा पद्धतीची ही पोस्ट आहे.

Sushmita Sen's first reaction after Lalit Modi' photo post

सुष्मिता सेनने हे पोस्ट करताच तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. चाहते खूप छान इमोजी पाठवल्या आहेत. आणि तिच्या आनंदात सहभागी होत आहेत. परंतु ललित मोदीने काहीदिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये सुष्मिता आणि त्यांचे फोटो शेअर करत, बेटरहाफ असे कॅप्शन दिले होते. परंतु नंतर ललित मोदीने ह्या ट्विट नंतर आणखी एक ट्विट केले कि, तुमच्या क्लियारीटीसाठी सांगत आहे. आम्ही लग्न केलं नसून, सध्या तरी एकमेकांना डेट करत आहोत. असे ललित मोदी यांनी सांगितले आहे.

Latest Posts

Don't Miss