spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लाडक्या बाप्पासाठी स्वरूप भालवणकर, सुदेश भोसले आणि आरजे अर्चना पानिया यांचा “बाप्पाचा बोलबाला” गाणं रिलीज

लाडक्या बाप्पाच्या उत्सवात येणारी नवीन नवीन गाणी गणेशभक्तांना फार आनंद देते. यावर्षी देखील या उत्सवात एक नवीन गाणं रिलीज झाला आहे. गायक संगीतकार स्वरूप भालवणकर (Swaroop Bhalvankar) , दिग्गज गायक सुदेश भोसले (Sudesh Bhosale) आणि प्रसिद्ध आरजे अर्चना पानिया (RJ Archana Pania) यांनी आपल्या लाडक्या बाप्पासाठी “बाप्पाचा बोलबाला” हे गाणं घेऊन आले आहेत. तर यंदाच्या गणेशोत्सवात “बाप्पाचा बोलबाला” हे गाणं सगळीकडे वाजणार आणि गाजणार सुद्धा आहे. “बाप्पाचा बोलबाला” हा म्युझिक व्हिडिओ नुकताच लाँच करण्यात आला आहे.

पॉवर पॅक्ड आणि एनर्जी ने भरपूर असा हा गणेशाचा ट्रॅक असून या गाण्याचे गायक संगीतकार स्वरूप भालवणकर हे आहेत. दिग्गज गायक सुदेश भोसले ह्यांनी सुद्धा ह्या गाण्याला आपला आवाज दिला आहे. सुदेश भोसले ह्यांनी आपल्या आवाजाने आजवर गणेश उत्सवाची शान वाढवली आहे. इतकच नव्हे तर प्रसिद्ध आरजे अर्चना पानिया पहिल्यांदाच सिंगर म्हणून या विडिओ द्वारे पदार्पण करत आहे. आरजे अर्चनाला स्वतः विश्वास बसत नव्हता कि त्यांना ही सुवर्ण संधी मिळाली आहे. त्यांचं म्हणणं आहे कि “गणपती बाप्पा ने मला दुसऱ्यांदा संगीतकार स्वरूप भालवणकर ह्यांच्या मुळे निवडला आहे.”

बॉलीवूड गीतकार कुमार यांनी या गाण्याचे बोल अगदी अप्रतिमपणे लिहिले आहे. युनिव्हर्स व्हायब्रंट आणि मोरया क्रिएशन्सद्वारे हे गाणं रिलीझ केलं गेलं आहे. तर सोशल मीडिया इन्फ्लूएंसर तन्मय पाटेकर ह्या गाण्यात आपल्याला पाहायला मिळतील. युनिव्हर्स व्हायब्रंटचे स्वरूप भालवणकर आणि प्रशांत थोपील यांनी या गाण्याची संकल्पना मांडली आहे, त्यांना खात्री आहे की “बाप्पाचा बोलबाला” या वर्षाच्या गणेश उत्सवासाठी सर्व मंडळे आणि गणेशभक्तांच्या प्लेलिस्टमध्ये नक्कीच असणार. तर “बाप्पाचा बोलबाला” या गाण्याचे बोल बॉलीवूड गीतकार कुमार यांनी अगदी अप्रतिमपणे लिहिले आहे. या गाण्यात सोशल मीडिया इन्फ्लूएंसर तन्मय पाटेकर देखील पाहायला मिळणार आहे. युनिव्हर्स व्हायब्रंट आणि मोरया क्रिएशन्सद्वारे हे गाणं रिलीझ करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महावाचन उत्सवाचे आयोजन, उत्सवाचे ब्रँड ॲम्बेसिडर Amitabh Bachchan

मरिन लाईन ते वांद्रे सी लिंक हा प्रवास 10 मिनिटात पूर्ण होणार, धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प ठरणार गेमचेंजर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss