Taali Web Series, सुष्मिताला सलाम! आज या ओटीटी वर रिलीझ…

अभिनेत्री सुष्मिता सेनची (Sushmita Sen) 'ताली' (Taali) ही वेब सीरिज आजच प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमधील तिची भूमिका पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची 'ताली' ही वेब सीरिज चर्चेत आहे.

Taali Web Series, सुष्मिताला सलाम! आज या ओटीटी वर रिलीझ…

अभिनेत्री सुष्मिता सेनची (Sushmita Sen) ‘ताली’ (Taali) ही वेब सीरिज आजच प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमधील तिची भूमिका पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची ‘ताली’ ही वेब सीरिज चर्चेत आहे. ही सीरिज तृतीयपंथी (third party) श्री गौरी सावंतच्या (Shri Gauri Sawant) जीवनावर आधारित आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनने गौरीची भूमिका साकारली आहे. ही सीरिज जिओ सिनेमा (Jio Cinema) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. आता या सीरिजमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार हे जाणून घेऊया.

‘ताली’ या सीरिजमध्ये तृतीयपंथींबाबत अनेकांच्या मनात उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आहेत. या सीरिजमध्ये गणेश पासून गौरी सावंत कशी तयार झाली याचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे. तिच्या या प्रवासात आलेले अनेक अडथळे, आनंदाचे क्षण हे सर्व काही सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. जेव्हा एखाद्या मुलाचा जन्म होतो तेव्हा आई-वडील मुलगा झाला आहे की मुलगी असा प्रश्न डॉक्टरांना विचारतात. गौरीचा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी मुलगा झाला असे तिच्या आई-वडीलांना सांगितले होते. कुटुंबीयांना प्रचंड आनंद झाला होता. त्यांनी मुलाचे नाव गणेश ठेवले. लहानपणापासूनच आई-वडीलांनी गणेशला समाजाप्रती एका मुलाच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास भाग पाडले. मात्र, गणेशचे आकर्षण बांगड्या, बाहुल्यांकडे होते. जेव्हा हे सत्य गणेशच्या वडिलांना कळाले तेव्हा त्याला घरातून बाहेर काढण्यात आले. वडिलांनी गणेश जीवंत असताना त्याचे श्राद्ध घातले. पुढे गणेश कुठे गेला? समाजाशी कसा संघर्ष केला? गणेश पासून गौरी कसा बनला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सीरिज पाहून मिळणार आहेत.

‘ताली’ या सीरिजची निर्मिती अर्जुन सिंग्घ बरन (Arjun Singh Baran) आणि करकट डी (Karkat D) यांनी केली आहे. त्यांनी सुष्मिता सेनला या भूमिकेची ऑफर दिली. सीरिजमधील सुष्मिताच्या कामाचे प्रचंड कौतुक होत आहे. सुरुवातीला या सीरिजमधील लूक पाहून सुष्मिताला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. मात्र, सुष्मिताने याकडे दुर्लक्ष करत कामावर लक्ष केंद्रीत केले. सध्या तिची ‘ताली’ ही सीरिज प्रचंड गाजत आहे.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यदिनी निमित्त पुण्यासह राज्यातील १८६ कैद्यांची होणार सुटका…

Har Ghar Tiranga मोहिमेच्या नावावर सुपरहिट रेकॉर्ड, ८.८ कोटी लोकांनी अपलोड केले सेल्फी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version