‘नाकात नथ’ गाण्यातील मानसी नाईकच्या लूकची चर्चा, आदित्य घरतबरोबरच्या या गाण्यातून प्रेक्षकांना लावलं वेड

नाकातील नथीने अर्थात तरुणीच्या सौंदर्यात भर पडते. नथीचा नखरा ही थीमदेखील विशेष चर्चेत राहिली, यानंतर आता पुन्हा नाकातील नथीची भुरळ घालायला एका रोमँटिक, बहारदार गाण्याची भर पडली आहे, हे गाणं म्हणजे 'नाकात नथ' (Nakat Nath)

‘नाकात नथ’ गाण्यातील मानसी नाईकच्या लूकची चर्चा, आदित्य घरतबरोबरच्या या गाण्यातून प्रेक्षकांना लावलं वेड

Nakat Nath Song Out : नाकातील नथीने अर्थात तरुणीच्या सौंदर्यात भर पडते. नथीचा नखरा ही थीमदेखील विशेष चर्चेत राहिली, यानंतर आता पुन्हा नाकातील नथीची भुरळ घालायला एका रोमँटिक, बहारदार गाण्याची भर पडली आहे, हे गाणं म्हणजे ‘नाकात नथ’ (Nakat Nath). अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या नाकात नथ या गाण्याने प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकविला आहे. साऱ्यांना भुरळ घालणाऱ्या या गाण्यातून एक नवी कोरी जोडीही त्यांचा नखरा दाखवताना दिसत आहे. ही जोडी म्हणजे अभिनेत्री मानसी नाईक आणि अभिनेता आदित्य घरत (Aditya Gharat – Manasi Naik).

या बेधुंद आणि धमाकेदार गाण्यातून मानसी नाईकचा नखरेल अंदाज विशेष भावतोय. यापूर्वीच्या तिच्या सर्वच गाण्यांनी रसिकांना थिरकायला भाग पाडलं आता यानंतरही तिचं आलेलं हे मराठमोळं नाकात नथ हे गाणं साऱ्यांच्या दिलावर राज्य करतंय. गायक रोहित राऊत व गायिका सोनाली सोनावणे (Singer Rohit Raut and singer Sonali Sonawane) यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध केलेल्या या गाण्याला मानसी व आदित्यने चार चाँद लावले आहेत. या गाण्याच्या दिग्दर्शनाची व स्क्रीनप्लेची दुहेरी धुरा मनीष महाजन (Manish Mahajan) यांनी सांभाळली असून संगीताची जबाबदारी आर.तिरुमल (R.Tirumal) यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. मानसी व आदित्य यांचं नखरेल swag असलेलं हे नाकात नथ गाणं साऱ्यांना ठेका धरायला लावतंय.

हे ही वाचा:

इकोफ्रेंडली सुंदर माझा बाप्पा स्पर्धा २०२४

टाईम महाराष्ट्र आयोजित “इकोफ्रेंडली सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२४

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version