Salman Khan च्या वाढदिवसाच्या दिवशी चर्चा होतेय, एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीची

बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमान खाानचा (Salman Khan) आज ५७ वा वाढदिवस आहे. सलमान खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Salman Khan च्या वाढदिवसाच्या दिवशी चर्चा होतेय, एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीची

Happy Birthday Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमान खाानचा (Salman Khan) आज ५७ वा वाढदिवस आहे. सलमान खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण काही सेलिब्रिटी सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनला हजर झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनला शहरुख खान, अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तसेच सलमान खानच्या कुटुंबातील काही सदस्य देखील बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये सामील झाले.

सलमान खानसोबत संगीता बिजलानी या अभिनेत्रीचं नाव जोडलं जातं. संगीता ही सलमानची एक्स गर्लफ्रेंड आहे, असंही म्हटलं जातं. सलमानच्या ५७ व्या वाढदिवसाच्या पार्टीला संगीतानं ब्लु ग्लिटर ड्रेस, सिल्वर इअरिंग्स अशा लूकमध्ये हजेरी लावली. तर सलमान हा त्याच्या बर्थ-डे पार्टीला ऑल इन ब्लॅक अशा लूकमध्ये दिसला. या बर्थ-डे पार्टीमधील संगीता आणि सलमानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हायरल फोटोमधील या दोघांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधलं. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलमान खान त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीला कारपर्यंत बाहेर सोडण्यासाठी आला आहे. यादरम्यान सलमान संगीताला मिठी मारताना आणि कपाळावर चुंबन घेताना स्पष्ट दिसत आहे. या ताज्या छायाचित्रांवरून आता सलमान खान आणि संगीता बिजलानी पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत का, असा अंदाज लावला जात आहे. कदाचित भाईजान पुन्हा संगीताच्या प्रेमात पडला असेल अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. रिपोर्टनुसार, सलमान आणि संगीता हे जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट करत होते. सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे ही वाचा:

Happy Birthday Salman Khan एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेणारा सलमान आजही १ बीएच फ्लॅटमध्ये राहतो?

Happy Birthday Salman Khan बॉलिवुडच्या दबंग स्टारने ५७ व्या वर्षी केक कट करत मानले चाहत्यांचे आभार

Salman khan – Aishwarya rai म्हणजे ९० च्या दशकातील लोकप्रिय जोडी, जाणून घ्या यांच्या ९० च्या दशकातील लोकप्रिय जोडी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version