दृश्याम २ च्या यशाबद्दल बोलताना तब्बूने केला ‘हा’ खुलासा

दृश्याम २ च्या यशाबद्दल बोलताना तब्बूने केला ‘हा’ खुलासा

बॉलीवूड अभिनेत्री तब्बू ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभाशाली अभिनेत्र्यांपैकी एक आहे. तिने या वर्षी ‘दृश्यम २’ आणि ‘भूल भुलैया २’ सारखे दोन बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि ती तिच्या उत्कृष्ठ अभिनयामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती सध्या बॅक टू बॅक रिलीजसह तिच्या करिअरच्या यशाच्या शिखरावर आहे. गेल्या काही वर्षांत तिने जय हो, दृष्यम, गोलमाल अगेन आणि दे दे प्यार दे यांसारख्य चित्रपटांमध्ये अनेक उतामोत्तम परफॉर्मन्स दिले आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री तब्बूने या वर्षी अनेक चित्रपटांमध्ये काम केल आहे. हे वर्ष बॉलीवूड सिनेमांसाठी काही चांगले ठरले नाही. तरी सुद्धा या वर्षी अभिनेत्री तब्बूचे ‘दृश्यम २’ आणि ‘भूल भुलैया २ हे दोन्ही चित्रपट खूप हिट ठरले. यावर अभिनेत्री कंगना रानौतने अलीकडेच तिच्या ट्विटर खात्यावरून ट्विट करत अभिनेत्री तब्बूची भरपूर स्तुती केलीआहे. कंगनाने तर तिच्या ट्विटमध्ये असे लिहिले की “अभिनेत्री तब्बू ही सध्या एकटीच अभिनेत्री आहे जिच्यामुळे बॉलीवूड टिकून आहे.” कंगनाच्या मते, बॉलीवूडमध्ये फक्त तब्बूचं अशी आहे की जिच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हे खरंच आहे की सध्या बॉलीवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. पण अभिनेत्री तब्बूचे ‘दृश्यम २’ आणि ‘भूल भुलैया २’ हे चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात चालले आहेत.

तब्बूने एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीत तब्बूला तिच्या दृश्यम २ च्या यशाबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर तब्बूने सांगितल की, “ती २०२१ या वर्षाला घटनापूर्ण, आव्हानात्मक आणि खडतर म्हणते कारण तिला एकाच वेळी चार-पाच चित्रपटांचे शूटिंग करायचे होते. तिच्या कारकिर्दीतील वाढत्या यशाबद्दल बोलताना तब्बू म्हणाली की, गेल्या दीड वर्षांपासून तिला हे यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली पण हा अनुभव एक आनंददायी प्रवास होता.

तब्बूचा नुकताच रिलीज झालेला, अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम २’,, हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सर्वत्र कौतुक होत आहे. या क्राईम-थ्रिलरमध्ये अक्षय खन्ना, श्रिया सरन आणि इशिता दत्ता मुख्य भूमिकेत आहेत. याच नावाच्या २०२१ मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.

हे ही वाचा :

Apurva Agnihotri Shilpa Baby पोस्ट शेअर करत अपूर्व आणि शिल्पाने सांगितलं लेकीचं नाव, लग्नाच्या १८ वर्षानंतर झाले चिमुकल्या पावल्याचं आगमन

संजय राऊतांनी सुनावले खडेबोल, सोलापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version