spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तारक मेहता का उल्टा चष्मा मधील टप्पू मालिका सोडणार ?

अभिनेता राज अंदकत ची जागा कोण घेणार याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने आजवर अनेक वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं आहे. या मालिकेतील कलाकारांनी वर्षानुवर्षे साकारलेल्या भूमिका ही बऱ्याच लोकप्रिय झाल्या आहेत. परंतू मालिकेतील अनेक कलाकार हा शो सोडून जात आहेत. सर्वात आधी सर्वांची आवडती दया बेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी यांनी प्रेग्नंट असल्यामुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता. परंतू त्या एक वर्ष उलटून गेले तरी त्यांनी मालिकेत वापसी केलेली नाही. त्यामुळे त्यांनी हा शो सोडला यावर शिक्का मोर्तब झाला. काहीच दिवसांपूर्वी मालिकेतील तारक मेहता साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी ही हा शो सोडला.
आता या मालिकेतील टप्पू म्हणजेच अभिनेता राज अंदकत ही हा शो सोडणार असल्याची माहिती मिळतेय. मात्र, या चर्चेला अद्याप अभिनेता किंवा निर्मात्यांनी दुजोरा दिलेला नाही. या मालिकेतील अनेक कलाकार हा शो सोडून जात असल्याने त्यांच्या जागी नव्या कलाकारांची वर्णी लागतेय. अभिनेता राज अंदकत ची जागा कोण घेणार याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला आहे. बरेच दिवस तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील टप्पू ला दाखविण्यात आले नाही. अभिनेते मंदार चांदवडकर यांनी नुकतीच पिंकव्हिलाला एक मुलाखत दिली. यावेळी त्यांना राज विषयी देखील विचारण्यात आले. याविषयी बोलताना मंदार म्हणाले की, एक कलाकार म्हणून त्याने शो सोडला आहे की, नाही हे आम्हाला माहीत नाही. पण, हो त्याला आरोग्यविषयक काही समस्या आहेत. त्यामुळे तो मागील काही दिवस शूटिंगला येत नाहीये.
टप्पू शिक्षण घेण्यासाठी मुंबईच्या बाहेर गेल्याचे शो मध्ये दाखविण्यात आले आहे. त्यामुळे राज अंदकत ने ही मालिका सोडल्याचं म्हटलं जातंय. अभिनेता राज अंदकत 2017 पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘टप्पू’ची भूमिका साकारत आहे. या आधी अभिनेता भव्य गांधी ती भूमिका साकारत होता.

Latest Posts

Don't Miss