spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ललित प्रभाकरच्या ‘सनी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सर्वांचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर हा नेहमीच मालिका, चित्रपट, वेब सिरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे.

सर्वांचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर हा नेहमीच मालिका, चित्रपट, वेब सिरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. आपल्या अभिनयाची छाप त्याने प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच पाडली आहे.

अभिनेता ललित प्रभाकरचा नुकताच वाढदिवस झाला. यावेळी अभिनेता – दिग्दर्शक हेमंत ढोमे याने त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करत ललितला शुभेच्छा दिल्या आहेत. ललिताचा आगामी चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. ‘सनी’ असे या चित्रपटाचे नाव असून यात ललित प्रभाकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हेमंत ढोमेच्या चित्रपटात ललित प्रभाकर पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @lalit.prabhakar

तर हेमंत ढोमे या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. काही दिवसांपूर्वीच ललितचे एक पोस्टर प्रदर्शित करून या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तर आता प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझरमध्ये ललितचा फोटो असून त्यावर ‘हॅप्पी बर्थडे सनी भय्या’ असे लिहिले आहे. शिवाय वर ‘प्रिन्स ऑफ पारगाव’ असा बोर्डही दिसतोय. ही पोस्ट शेअर करत असताना हेमंतने भन्नाट कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले, “कुनी म्हनतं अग्गबाई, कुनी म्हनतं अय्या… बघुन ज्याला होते, मनाची ता थैय्या… ता थैय्या… ललित प्रभाकरचा वाढदिवस, म्हणजे मजा आ गय्या… मजा आ गय्या..!! आमचे लाडके ‘सनीभैय्या’ यांना त्या ठिकानी खूप खूप शुभेच्छा! भेटूया सनी भैय्याला १९ नोव्हेंबर पासुन तुमच्या जवळच्या थेटरमध्ये !”

 

View this post on Instagram

 

A post shared by @lalit.prabhakar

हे ही वाचा:

बिग बॉस १६ च्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

‘तारक मेहता का…’ मालिकेत नव्या कलाकाराची एन्ट्री

श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वेची जोडी ‘आपडी थापडी’ चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss