ललित प्रभाकरच्या ‘सनी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सर्वांचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर हा नेहमीच मालिका, चित्रपट, वेब सिरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे.

ललित प्रभाकरच्या ‘सनी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सर्वांचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर हा नेहमीच मालिका, चित्रपट, वेब सिरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. आपल्या अभिनयाची छाप त्याने प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच पाडली आहे.

अभिनेता ललित प्रभाकरचा नुकताच वाढदिवस झाला. यावेळी अभिनेता – दिग्दर्शक हेमंत ढोमे याने त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करत ललितला शुभेच्छा दिल्या आहेत. ललिताचा आगामी चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. ‘सनी’ असे या चित्रपटाचे नाव असून यात ललित प्रभाकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हेमंत ढोमेच्या चित्रपटात ललित प्रभाकर पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे.

हे ही वाचा:

बिग बॉस १६ च्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

‘तारक मेहता का…’ मालिकेत नव्या कलाकाराची एन्ट्री

श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वेची जोडी ‘आपडी थापडी’ चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version