बहुचर्चित ‘शिवप्रताप गरुडझेप’चा टीझर रिलीज

सध्या मराठी विश्स्वास एकामागून एक ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा होत आहे. तर अनेक चित्रपट प्रदर्शितही झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचा ऐतिहासिक चित्रपटांकडे पाहण्याचा ओढा देखील वाढला आहे.

बहुचर्चित ‘शिवप्रताप गरुडझेप’चा टीझर रिलीज

सध्या मराठी विश्स्वास एकामागून एक ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा होत आहे. तर अनेक चित्रपट प्रदर्शितही झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचा ऐतिहासिक चित्रपटांकडे पाहण्याचा ओढा देखील वाढला आहे. त्यातच आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Actor Dr. Amol Kolhe) हे नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. ‘शिवप्रताप-गरुडझेप’ (Shivpratap Garudjhep) असे या चित्रपटाचं नाव आहे. ‘आग्र्याहून सुटका’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग यात दाखवला जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

‘शिवप्रताप गरुडझेप’च्या टीझरमध्ये सुरुवातीला औरंगजेब उत्तरेत हिंदू मंदिरे पाडताना आणि प्रजेवर अन्याय करताना दिसतो. “तेरा ईश्वर तो नही आया तुझें बचाने, कौन आएगा” असं म्हणताना दिसतो. त्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील दमदार एंट्री होते. “यापुढे आमच्या धर्मावर जो कोणी घाला घालेल त्याचे हात मुळासकट उघडून देण्याची धमक आम्ही बाळगतो.” हा त्यांचा संवाद अंगावर अक्षरशः काटा आणतो. अवघ्या १ मिनिटाच्या या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.

‘शिवछत्रपती’ आणि ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकांनी जगभरात अफाट लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हटलं की, डॉ. अमोल कोल्हे यांचंच नाव प्रेक्षकांच्या मनात येतं. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा ‘शिवप्रताप’ मालिकेतील ‘गरुडझेप’ हा चित्रपट ५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटातील ‘बम बम भोले’ हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

हे ही वाचा:

श्वेता तिवारी मुलीला लग्न करण्याचा का सल्ला देत नाही ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version